तिहेरी अपघातात एक ठार, चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2015 00:01 IST2015-09-06T23:35:58+5:302015-09-07T00:01:11+5:30
बीड : शहरातील बार्शी नाका परिसरातील नाळवंडीजवळील सय्यदनगर भागात तीन वाहनांच्या धडकेत एक ठार तर चार जखमी झाल्याची घटना रविवारी सांयकाळच्या सुमारास घडली.

तिहेरी अपघातात एक ठार, चार जखमी
बीड : शहरातील बार्शी नाका परिसरातील नाळवंडीजवळील सय्यदनगर भागात तीन वाहनांच्या धडकेत एक ठार तर चार जखमी झाल्याची घटना रविवारी सांयकाळच्या सुमारास घडली.
सुनील बबन पगारे (वय ३०) असे मयत तरूणाचे नाव आहे. पगारे हे दुचाकी (एमएच २३/७०९१) वरुन बीड शहराकडे येत होते. त्यादरम्यान समोरून येणाऱ्या टेम्पोवर ते धडकले. याचवेळी रिक्षा (एमएच २३ /५७४६) ही या दोन वाहनांवर येऊन धडकला. त्यामुळे रिक्षामधील मो. समीर, सकीया बेगम, मो. आरेफ व मो. जेवद्दीन (सर्व रा. धोंडीपुरा, बीड) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
याप्रकरणी पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. (प्रतिनिधी)