मौजे कुंद्राळा येथे शेतीच्या वादातून एकाचा खून

By Admin | Updated: August 7, 2014 01:27 IST2014-08-07T00:27:40+5:302014-08-07T01:27:06+5:30

बाऱ्हाळी: मौजे कुंद्राळा येथे ६ आॅगस्ट रोजी शेतीच्या वादातून एकाचा खून करण्यात आला़

One killed in farming controversy at Kundrala | मौजे कुंद्राळा येथे शेतीच्या वादातून एकाचा खून

मौजे कुंद्राळा येथे शेतीच्या वादातून एकाचा खून

बाऱ्हाळी: मौजे कुंद्राळा येथे ६ आॅगस्ट रोजी शेतीच्या वादातून एकाचा खून करण्यात आला़ मौजे कुंद्राळा येथील देवकत्ते व टिकणरे कुटुंबात गत काही वर्षांपासून शेतीच्या कारणामुळे वाद होत होता़ जुलै महिन्यातच दोन्ही कुटुंबात हाणामारीची घटना घडली होती़ त्यावरून परस्पराविरूद्ध गुन्हेही दाखल झाले होते़ बुधवारी सकाळी ८़३० च्या सुमारास मयत मारोती मष्णा देवकत्ते (वय ६५, रा़ कुंद्राळा) हे शेतातील तुषारचे पाईप बदलण्यासाठी गेले असता शेताच्या लगत असणाऱ्या रस्त्यावर आरोपी विश्वाबर मल्हारी टिकनरे, दिगांबर मल्हारी टिकनरे, पिराजी मल्हारी टिकनरे, पांडुरंग माधु टिकनरे, धुरपतबाई पांडुरंग टिकनरे, रेखा विश्वाभर टिकनरे यांनी अडवून धारदार शस्त्राने वार केला़ यात मारोती देवकत्ते जागीच गतप्राण झाले़
मयताचा भाऊ हणमंत मष्णा देवकत्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विश्वाभर टिकणरे, दिगांबर टिकणरे, पिराजी टिकनरे, पांडुरंग टिकनरे, धुरपतबाई टिकनरे, रेखा टिकनरे यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सपोनि दिलीप तिडके हे पुढील तपास करीत आहेत़ सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी ठरले़ (वार्ताहर)

Web Title: One killed in farming controversy at Kundrala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.