ट्रॅव्हल्सखाली चिरडून एक ठार

By Admin | Updated: July 27, 2014 01:09 IST2014-07-26T23:41:00+5:302014-07-27T01:09:39+5:30

दैठणा : परभणी-गंगाखेड रस्त्यावरील दैठण्यापासून जवळ असलेल्या चुना भट्टीजवळ ट्रॅव्हल्सखाली चिरडून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी ७़१५ वाजेच्या सुमारास घडली़

One killed after traveling under one | ट्रॅव्हल्सखाली चिरडून एक ठार

ट्रॅव्हल्सखाली चिरडून एक ठार

दैठणा : परभणी-गंगाखेड रस्त्यावरील दैठण्यापासून जवळ असलेल्या चुना भट्टीजवळ ट्रॅव्हल्सखाली चिरडून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी ७़१५ वाजेच्या सुमारास घडली़
या घटनेच्या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- २६ जुलै रोजी आमावस्या असल्याने गंगाखेड तालुक्यातील धसाडी येथील दीपक बाबूराव शिंदे (वय १९) व त्याचा नातेवाईक मारोती तुकाराम शिंदे (वय १८) हे दोघे एमएच २२ ई-८१४२ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पोखर्णी येथील नृसिंह मंदिरात दर्शनासाठी गेले होते़
दर्शन घेऊन धसाडीकडे परत जात असताना दैठणा गावापासून काही अंतरावर असलेल्या चुनाभट्टीजवळ सायकलला ओव्हरटेक करीत असताना दुचाकीस्वार दोघेही रस्त्यावर पडले़ याच दरम्यान गंगाखेडकडून भरधाव वेगाने एक ट्रॅव्हल्स आली़ या ट्रॅव्हल्सखाली चिरडून दीपक बाबूराव शिंदे याचा जागीच मृत्यू झाला़ तर मारोती तुकाराम शिंदे बालंबाल बचावले़
दरम्यान,ट्रॅव्हल्स चालक घटनेनंतर गाडी घेऊन पसार झाला़ दैठणा पोलिस ठाण्याचे गोविंद लोखंडे, जमादार खळीकर हे घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी फोन वरून पोलिस निरीक्षक तरोने यांना घटनेची माहिती दिली़ त्यावरून परभणी येथील नानलपेठ पोलिसांनी ही ट्रव्हल्स ताब्यात घेतली आहे़ सदर ट्रॅव्हल्स खुराणा यांची असल्याचे पोलिसांनी सांगितले़ (वार्ताहर)
आपत्कालीन सेवा नावालाच
एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर १०८ हा टोल फ्री क्रमांक डायल केल्यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविण्याची सेवा शासनाने सुरू केली आहे़ परंतु, ही सेवा नावापुरतीच असल्याचे चित्र आहे़
या सेवेअंतर्गत दैठणा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका दिली खरीे़ परंतु, या रुग्णवाहिकेचा काहीच उपयोग होत नाही, असे दिसले़ घटना घडल्यानंतर दैठणा येथील काही युवक मंडळी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी १०८ क्रमांक डायल केला़ मात्र हा क्रमांक सुरूवातीला पुणे येथे जातो, त्या ठिकाणी चौकशी होते़ चौकशीत बराच वेळ निघून जातो़
पुणे येथून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास माहिती दिली जाते़ या सर्व खटाटोपात अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला अन्य एका वाहनाने परभणी येथे उपचारासाठी घेवून जावे लागते़ कमीत कमी वेळेत मदत पोहोचविण्यासाठी ही यंत्रणा नेहमी तत्पर असणे गरजेचे आहे़ परंतु, याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते़ त्यामुळे शासनाची आपत्कालीन सेवा ही केवळ नावापुरतीच असल्याचे दिसत आहे़

Web Title: One killed after traveling under one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.