मुलीस त्रास देऊन एकास मारहाण
By Admin | Updated: May 19, 2014 01:06 IST2014-05-19T00:29:47+5:302014-05-19T01:06:46+5:30
लातूर : रस्त्यावरून ये -जा करणार्या एका मुलीस त्रास देण्यात येत असल्याने त्याची विचारणा करणार्यास तिघांनी संगनमत करून मारहाण करून

मुलीस त्रास देऊन एकास मारहाण
लातूर : रस्त्यावरून ये -जा करणार्या एका मुलीस त्रास देण्यात येत असल्याने त्याची विचारणा करणार्यास तिघांनी संगनमत करून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी शुक्रवारी गांधी चौक पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शहरातील आनंद नगरातील परमेश्वर मल्लिकार्जुन स्वामी व अन्य दोघांनी संगनमत करून एका महिलेच्या नातीस रस्त्यावरुन जा- ये करीत असताना नेहमी त्रास देण्यात येत होता़ त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी सदरील महिलेचा मुलगा शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास गेला़ तेव्हा परमेश्वर स्वामी याने त्याच्या डाव्या दंडाचा चावा घेऊन जखमी केले़ सोबतच्या दोघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली़ तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली़ याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यातील एकास पोलिसांनी अटक केली असून, तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)