दोन हजार डॉक्टरांचा एकदिवसीय संप
By Admin | Updated: March 20, 2017 23:42 IST2017-03-20T23:39:02+5:302017-03-20T23:42:06+5:30
लातूर : शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर व रुग्णालयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ लातुरातील ५५० डॉक्टरांनी सोमवारी दिवसभर काम बंद आंदोलन केले.

दोन हजार डॉक्टरांचा एकदिवसीय संप
लातूर : शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर व रुग्णालयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ लातुरातील ५५० डॉक्टरांनी सोमवारी दिवसभर काम बंद आंदोलन केले. शहरातील गांधी चौकात हल्ल्याचा निषेध केला. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील दोन हजार दवाखाने दिवसभर बंद होती. हल्लेखोरांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.
गेल्या आठवडाभराच्या कालावधीत डॉक्टर व रुग्णालयांवर हल्ला होण्याच्या तीन-चार घटना घडल्या आहेत. या घटनांचा निषेध सोमवारी इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, आयडीए, होमिओपॅथी असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आला. गांधी चौकात डॉक्टरांनी दिवसभर आंदोलन केले. या आंदोलनात आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक गुगळे, सचिव डॉ. कल्याण बरमदे, डॉ. भाऊराव यादव, डॉ. मुंदडा, डॉ. हमिद चौधरी, डॉ. नंदकुमार डोळे, डॉ. अजय जाधव, डॉ. पोतदार, डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. वर्धमान उदगीरकर, डॉ. श्याम सोमाणी, डॉ. काळगे, डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. निलंगेकर, डॉ. रमेश भराटे, डॉ. राजपूत, डॉ. कांचन भोरगे, डॉ. शार्दुल शिंदे, डॉ. श्रीराम कुलकर्णी, डॉ. टी.एस. खतिब आदी सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी जवळपास साडेपाचशे डॉक्टर्स उपस्थित होते.
डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टर हा देव नाही, त्यामुळे औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया करताना गुंतागुंत होण्याचा धोका असतो. मात्र रुग्ण व नातेवाईकांकडून अनेकदा गैरसमजातून डॉक्टरांवर हल्ले केले जातात. वास्तविक प्रत्येक डॉक्टर रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो. मात्र काही रुग्णांची परिस्थिती विविध कारणांमुळे आटोक्याबाहेर जाते. त्यास डॉक्टरला (अधिक वृत्त हॅलो / २ वर)