एक कोटी रुपयांची रक्कम खात्यावर वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 23:34 IST2017-07-05T23:31:20+5:302017-07-05T23:34:16+5:30
चारठाणा : जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिंतूर पंचायत समितीकडे विविध योजनेंतर्गत साडेसहा कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली

एक कोटी रुपयांची रक्कम खात्यावर वर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा : जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिंतूर पंचायत समितीकडे विविध योजनेंतर्गत साडेसहा कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली असून त्यातील १ कोटी रुपयांची रक्कम जिंतूर पंचायत समितीने लाभार्थ्यांच्या खात्यावर बुधवारी जमा केली आहे.
जिल्हा परिषदेच्या तसेच शासनाच्या विविध योजनेंतर्गत आलेली रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेने लाभार्थ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावी, अशी मागणी जि. प. सदस्या मीनाताई राऊत यांनी जिल्हा बँकेच्या महाव्यवस्थापकाकडे ४ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे केली होती.
या निवेदनाची दखल घेत जिल्हा बँकेने जिंतूर पंचायत समितीकडे बुधवारी साडेसहा कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. त्यातील १ कोटी रुपयांची रक्कम जिंतूर पंचायत समितीने लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.