एकाला न्यायालयीन तर दुसऱ्याला पोलीस कोठडी
By Admin | Updated: July 24, 2015 00:44 IST2015-07-24T00:21:20+5:302015-07-24T00:44:00+5:30
जालना : येथील एका साडेसतरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना गुुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते

एकाला न्यायालयीन तर दुसऱ्याला पोलीस कोठडी
जालना : येथील एका साडेसतरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना गुुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातील एकाला न्यायालयीन तर दुसऱ्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी सापळा लावलेला असतानाही दुसऱ्यांदा त्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्या दोन आरोपींपैकी एकास २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जालना शहरातील एक अल्पवयीन मुलगी सोमवारी (ता. ६ जुलै ) रोजी रात्री मित्रासह नाव्हा बायपास रस्त्यावर फिरायला गेली होती. तेथे २० ते २५ वयोगटातील दोन तरूण त्यांच्याजवळ आले. त्यांनी पोलिस असल्याची बतावनी करून बलात्कार केला होता. आरोपींनी त्यामुलीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याने तो मोबाईल देण्यासाठी पिडीत मुलीला खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास सुरू असताच आरोपींनी मोबाईल परत देण्यासाठी त्या मुलीला बोलावले होते. त्यावरून पोलिसांनी एकदा सापळा अयशस्वी झालेल्या असतानाही दुसऱ्यांदा आरोपींना अटक करण्यासाठी ९ जुलै रोजी सापळा लावला होता. पोलिसांनी सापळा लावलेला असतानाही आरोपींनी मध्येच त्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार केला. तेव्हा पोलिसांनी ९ जुलै रोजीच रात्रीच दोन्ही आरोपींना अटक केले होते. तसेच दुसऱ्यांदा बलात्कार केल्याप्रकरणाचा गुन्हाही दाखल केला होता. दोन्ही आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. त्या कोठडीची मुदत संपल्याने दोघांनाही १६ जुलै रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान, पुन्हा कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता पहिल्या म्हणजे ६ जुलै झालेल्या बलात्कार प्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ९ जुलै रोजी पोलिसांच्या सापळ्यातून त्या मुलीस नेवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा १० जुलै रोजी दाखल करण्यात आलेला आहे.
या दुसऱ्या गुन्ह्यात त्या दोघांपैकी एका आरोपीस त्या गुन्ह्यात पुन्हा अटक केली आहे. त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता २७ जुलै पर्यंत त्यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम हे करीत असल्याची माहिती सूत्रांनी
दिली. दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळालेल्या एका आरोपीस जालना जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. तर दुसऱ्या आरोपीस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. (वार्ताहर)
आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी सापळा लावलेला असतानाही त्या पिडीत मुलीला रस्त्यातूनच अपहरण करून तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात अगोदरच्या बलात्कार प्रकरणातील दोघांपैकी एकास पून्हा कोठडी सुनावण्यात असून त्याच्याकडून या दुसऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रानी दिली.