मारहाण प्रकरणी एकास सक्तमजुरी

By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T23:52:44+5:302015-12-14T23:53:04+5:30

उस्मानाबाद : एकास लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केल्याप्रकरणी एका आरोपीस उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़आऱऔटी यांनी सहा महिने सक्तमजुरी

One in the assault case | मारहाण प्रकरणी एकास सक्तमजुरी

मारहाण प्रकरणी एकास सक्तमजुरी


उस्मानाबाद : एकास लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केल्याप्रकरणी एका आरोपीस उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़आऱऔटी यांनी सहा महिने सक्तमजुरी व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ही घटना कसई (ता़तुळजापूर) येथे २ फेब्रुवारी रोजी घडली होती़
याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी़वाय़जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कसई येथील सचिन पांडुरंग बनसोडे हे त्यांच्या विटभट्टीवर थांबले होते़ त्यावेळी तेथे आलेल्या यशपाल विलास लबडे (रा़मंगरूळ) याने ‘पांड्या कोठे आहे’ अशी विचारणा केली़ त्यावेळी सचिन बनसोडे याने ‘माझ्या वडिलांचे नाव पांडूरंग आहे, तू तोंडाने नीट बोल’ असे म्हणताच यशपाल लबडे याने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली़ विटभट्टीवरील कामगारांनी भांडण सोडवासोडव केली़ याबाबत सचिन बनसोडे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून यशपाल लबडे याच्याविरूध्द गुरनं ८/२०१५ कलम ३२४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तपासादरम्यान कलम ३ (१) (१०) अ़जा़ज़अ़प्र कायद्यानुसार कलम वाढविण्यात आले होते़ या गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन विधाते यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़आऱ औटी यांच्यासमोर झाली़ सरकार पक्षाकडून सात साक्षीदार तपासण्यात आले़ सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी़वाय़जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़आऱ औटी यांनी आरोपी यशपाल विलास लबडे याला भादंवि कलम ३२४ अन्वये सहा महिने सक्तमजुरी व ५०० रूपये दंड, दंड न दिल्यास आणखी एक आठवड्याची साधी कैद, अशी शिक्षा सुनावली़

Web Title: One in the assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.