मका व्यापाऱ्याची पिशवी कापून दीड लाख पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:16+5:302020-12-17T04:31:16+5:30
एएस क्लबजवळील तापडिया इस्टेट येथील राजकुमार हंसराज गंगवाल (६५) हे मका खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. १४ डिसेंबर रोजी दुपारी त्यांनी ...

मका व्यापाऱ्याची पिशवी कापून दीड लाख पळविले
एएस क्लबजवळील तापडिया इस्टेट येथील राजकुमार हंसराज गंगवाल (६५) हे मका खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. १४ डिसेंबर रोजी दुपारी त्यांनी देवगाव रंगारी येथील बँक ऑफ महाराष्ट्रमधून ४ लाख ५० हजार रुपये काढले. ही रक्कम कापडी पिशवीत ठेवून ते एसटी बसने औरंगाबादला आले. नगर नाका येथे बसमधून उतरून रिक्षाने घरी गेले. तेव्हा रिक्षाचालकाला पैसे देण्यासाठी त्यांनी पिशवीत हात घातला असता त्यांना त्यांची पिशवी कापलेली दिसली. यानंतर त्यांनी घरी जाऊन पैसे मोजले असता त्यात ३ लाख रुपयेच होते. दीड लाख रुपये पळविल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रात्री ७ वाजता छावणी पोलीस ठाणे गाठले. पोलीस हवालदार दिलीप जाधव तपास करीत आहेत.
=====================
सराफ्यात महिलेच्या पर्समधून ६० हजार पळविले
औरंगाबाद : सराफा बाजारातील बेन्टेक्स दुकानात बांगड्या खरेदी करणाऱ्या महिलेची पर्स उघडून चोरट्यांनी ६० हजार रुपये लंपास केले. ही घटना १३ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजता घडली. महिलेने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला सराफा बाजारातील चिंचेच्या झाडाजवळील दुकानात बांगड्या घेण्यासाठी गेली होती. बांगड्या खरेदी करण्यात व्यग्र असल्याची संधी साधून चोरट्यांनी पर्सची चेन उघडून ६० हजार रुपये पळविले. पोलीस हवालदार दापके तपास करीत आहेत.