शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

सासर-माहेरचा मान वाढला; मेहनतीच्या बळावर दोन मुलांची आई झाली PSI, राज्यातून चौथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 13:53 IST

२०१९ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मुलगा जितेश आणि शौर्य या दोन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन अभ्यास सुरू केला.

सोयगाव (औरंगाबाद ) : तालुक्यातील कंकराळा येथील माहेर आणि बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील सासर असलेल्या रेणुका देवीदास राजपूत (परदेशी) हिने दोन्ही कुटुंबीयांच्या आधाराने व प्रचंड मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. नुकत्याच लागलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या निकालात पोलीस उपनिरीक्षकपदी तिची नियुक्ती झाली असून, राज्यात चौथा क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला.

कंकराळा (ता. सोयगाव) येथील माहेर असलेल्या रेणुका देवीदास परदेशी हिचा विवाह बुलडाणा जिल्ह्यातील डॉ. विनोद धनावत यांच्याशी दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यावेळी रेणुका राजपूत यांनीही वैद्यकीय पदवी घेऊन खासगी वैद्यकीय व्यवसायाचा वसा हाती घेतला. दरम्यान, वैद्यकीय सेवा बजावताना महिलांवर अन्यायाच्या अनेक प्रसंग त्यांनी डोळ्याने पाहिले. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी होऊन महिलांच्या न्यायहक्कासाठी लढा देण्याचा त्यांनी निश्चय केला. २०१९ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मुलगा जितेश आणि शौर्य या दोन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन अभ्यास सुरू केला. यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी त्यांना आधार दिला. रेणुका हिने अभ्यासावर अधिकाधिक लक्ष देण्यासाठी घरातील प्रत्येकाने लक्ष दिले. समाजाचे काही तरी देणे लागतो. त्यासाठी अधिकारी होऊन सेवा करण्याचा संकल्प असल्याने रेणुकानेदेखील अभ्यासात सातत्य ठेवले. अखेर २०२२ साली लागलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत त्यांनी चौथा क्रमांक घेऊन यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल माहेर आणि सासरघरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आजोबांचा गाव विकासाचा आदर्शमाहेरी सुरुवातीपासून समाजसेवा करण्याचा वारसा आहे. रेणुका राजपूत (परदेशी) यांच्या आई, वडील, काका-काकू यांच्याकडून गाव विकासाचे बाळकडू मिळालेले आहे, तर आजोबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लग्नानंतरदेखील अभ्यास करीत यश संपादन केले. असे रेणुका यांचे वडील देवीदास परदेशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस