शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 16:42 IST

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने १६ जुलै रात्री ८ ते १७ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल केला आहे.

वाळूज महानगर : छोटे पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने १६ जुलै रात्री ८ ते १७ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल केला आहे.

हे मार्ग बंद :- छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. एएस क्लब चौक ते कामगार चौकापर्यंत रस्ता पूर्णत: सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. तिरंगा चौक पंढरपूर ते आंबेडकर चौक (एफडीसी कॉर्नर) रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. नगर महामार्गावरील नगर नाका ते ए एस क्लब चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद असेल.

असा असेल पर्यायी मार्ग...- जालना/बीडकडून अहमदनगर-पुण्याकडे जाणारी अवजड वाहने ही महानुभाव आश्रम चौक, लिंक रोडपासून पुढे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळे हायवे मार्गे साजापूर फाटा, एनआरबी चौक, एफडीसी कॉर्नर, कामगार चौक मार्गे पुढे जातील.- जालना/बीडकडून अहमदनगर-पुण्याकडे जाणारी हलकी वाहने नगर नाका, मिटमिटा, तीसगाव चौफुली, वडगाव कोल्हाटी, सारा सार्थक, शनी मंदिर, कार्तिक हॉटेल, रांजणगाव फाटा, एफ.डी.सी. कॉर्नर, कामगार चौक मार्गे वाळूजहून पुढे जातील,-जालना/बीड/जळगावकडून धुळे, नाशिककडे जाणारी वाहने लिंक रोड किंवा वाल्मी नाका, राष्ट्रीय महामार्ग नवीन सोलापूर-धुळे हायवे मार्गाने पुढे जातील व येतील.- छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने नगर नाका, मिटमिटा, तिसगाव चौफुली, वडगाव कोल्हाटी, महाराणा प्रताप चौक, एफ.डी.सी. कॉर्नर, कामगार चौक मार्गे जातील किंवा साजापूर गावातून एनआरबी चौक रांजणगाव-एफडीसी कॉर्नर-कामगार चौकमार्गे पुढे जातील.- पुणे-अहमदनगरकडून जालना-बीडकडे जाणारी अवजड वाहने ही ईसारवाडी, बिडकीनमार्गे जातील व त्याच मार्गाने येतील.- पुणे-अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगर शहरात येणारी हलकी वाहने पाटोदा टी-पॉइंटमार्गे संताजी चौकी, वाल्मी नाका, महानुभाव चौकमार्गे पुढे जातील.- पुणे-अहमदनगरकडून धुळे-नाशिककडे जाणारी हलकी वाहने पाटोदा टी-पॉइंटमार्गे संताजी चौकी, वाल्मी नाका मार्गे राष्ट्रीय महामार्ग नवीन सोलापूर- धुळे हायवे मार्गे पुढे जातील.

वाहनधारकांना सूचनाबंदोबस्तावर असणारे पोलिस अधिकारी आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील, विशेष म्हणजे ही अधिसूचना पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही, या अधिसूचनेचा भंग करणाऱ्याविरोधात विविध कायद्यांन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी सूचना वाहतूक शाखेकडून जाहीर करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAshadhi Ekadashiआषाढी एकादशी