आॅलिम्पिक संघटना करणार क्रीडा मार्गदर्शक, शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:42 IST2018-01-16T00:42:31+5:302018-01-16T00:42:37+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजवावी, तसेच जास्तीत जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवताना औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे यंदापासून क्रीडा शिक्षक, मार्गदर्शकांचा गौरव करण्यात येणार आहे.

आॅलिम्पिक संघटना करणार क्रीडा मार्गदर्शक, शिक्षकांचा गौरव
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजवावी, तसेच जास्तीत जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवताना औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे यंदापासून क्रीडा शिक्षक, मार्गदर्शकांचा गौरव करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यात प्रशिक्षक, क्रीडा शिक्षकांचे मुख्य योगदान असते; परंतु त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने आयोजित हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी शहरातील विविध क्रीडा संघटनांनी पुरस्कारासाठी क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक यापैकी एका नावाची शिफारस संघटनेच्या लेटरहेडवर औरंगाबाद जिल्हा संघटनेचे सचिव गोविंद शर्मा, सहसचिव दिनेश वंजारे यांच्याकडे २० जानेवारीपर्यंत करावी, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, कार्याध्यक्ष बिजली देशमुख, उपाध्यक्ष कमांडर विनोद नरवडे, सौरभ भोगले, डॉ. उदय डोंगरे, डॉ. अब्दुल कदीर, डॉ. फुलचंद सलामपुरे, सचिव गोविंद शर्मा, डॉ. मकरंद जोशी, कुलजितसिंग दरोगा, विश्वास जोशी आदींनी केले आहे.