४०० रुपयांसाठी वृद्धाचा खून
By Admin | Updated: July 17, 2017 00:42 IST2017-07-17T00:40:57+5:302017-07-17T00:42:15+5:30
तलवाडा : उसने दिलेले ४०० रुपये मागितल्याच्या कारणावरून वृद्धाला काठीने मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या वृद्धाचा मृत्यू झाला.

४०० रुपयांसाठी वृद्धाचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
तलवाडा : उसने दिलेले ४०० रुपये मागितल्याच्या कारणावरून वृद्धाला काठीने मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील अंतरवली येथे शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लहू मारुती उमाप (६५, रा. अंतरवली, ता. गेवराई) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. लहू उमाप यांनी महादेव हिरामण उमाप यांना ४०० रुपये दिले होते. ते पैसे मागण्यासाठी ते गेले होते. पैसे देण्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. लहू उमाप यांना महादेव उमाप, मधुकर उमाप, सदाशिव उमाप व यादव उमाप या चौघांनी काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे त्यांचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला.
रविवारी दुपारी करण लहू उमाप यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.