म्हसरूळ शिवारात वृद्ध महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:54 IST2017-09-19T00:54:06+5:302017-09-19T00:54:06+5:30
जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ शिवारात सरुबाई कांशीराम दांडगे या वृद्ध महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना घडली

म्हसरूळ शिवारात वृद्ध महिलेचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ शिवारात सरुबाई कांशीराम दांडगे या वृद्ध महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेमुळे शेतात राहणाºया कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दांडगे कुटुंबीय हे मूळचे आरदखेडा येथील रहिवासी असून त्यांची शेती म्हसरूळ शिवारात असल्याने ते काही वर्षपूर्वी म्हसरूळ येथे राहायला गेले होते. परत याच वर्षी ते गावात न राहता पावसाळ्या पूर्वी आपल्या शेतात राहण्यासाठी गेले होते.