शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
3
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
4
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
5
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
6
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
7
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
8
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
9
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
10
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
11
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
12
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
13
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
14
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
15
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
16
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
17
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
18
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
19
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
20
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...

जुने, फाटलेले रेशन कार्ड जाणार, आता मोबाइलवर ठेवा ई-रेशन कार्ड ! 

By विकास राऊत | Published: August 18, 2023 7:00 PM

सध्या अस्तित्त्वात असलेले रेशन कार्ड नागरिक ई-कार्डमध्ये रूपांतरित करून घेऊ शकतात.

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने ई - रेशन कार्ड देण्याबाबत निर्णय घेतला असून, त्यानुसार संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्रत्येक रेशन कार्डधारकांना आता ई - रेशन कार्ड मिळणार आहे.

सध्या अस्तित्त्वात असलेले रेशन कार्ड नागरिक ई-कार्डमध्ये रूपांतरित करून घेऊ शकतात. घरबसल्या ऑनलाइन ई-रेशन कार्डची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

प्रत्येकाला मिळणार ई - रेशन कार्डसार्वजनिक वितरण व्यवस्थेत रेशन कार्डऐवजी ई - रेशन कार्ड लाभार्थींना ऑनलाइन काढता येईल. जुने, फाटलेले रेशन कार्ड नको असेल तर ऑनलाइन नोंदणी करून ई-रेशन कार्ड नागरिक घेऊ शकतील. नागरिकांना पाहिजे तेव्हा ऑनलाइन ते कार्ड ओपन करता येईल. प्रत्येकाला ई-रेशन कार्ड मिळणे शक्य आहे.

जिल्ह्यात कधीपासून मिळणार?जिल्ह्यात ई-रेशन कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाच्या संकेतस्थळावर (वेबसाइटवर) याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. ई-मेल, मोबाइल फोन आदींद्वारे पीडीएफ, फोटो स्वरूपात हे ई-रेशन कार्ड हव्या त्या ठिकाणी उपलब्ध होईल. ऑनलाइन असल्यामुळे कार्ड डाउनलोड करून प्रिंट काढणेही शक्य होईल.

जिल्ह्यात पाच लाख रेशन कार्डधारकजिल्ह्यात ५ लाख ६३ हजार ४१७ रेशन कार्डधारक आहेत. यामध्ये अंत्योदय योजनेची ६६ हजार १०५, प्राधान्य कुटुंबांचे ४ लाख २४ हजार ६२४, तर शेतकरी कुटुंंब योजनेंतर्गत ७२ हजार ६८८ रेशन कार्डधारक आहेत.

नागरिक अर्ज करू शकतातजिल्ह्यात ई-रेशन कार्डची सुविधा देण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी शासनाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. ई-रेशन कार्डबाबत शासनाचा अध्यादेश पुरवठा विभागाला प्राप्त झाला आहे. ज्या नागरिकांना ई-रेशन कार्ड हवे असेल ते ऑनलाइन माहिती भरून घेऊ शकतात.- वर्षाराणी भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग