जुन्या भांडणातून कुटुंबाला घरात घुसून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:04 IST2021-06-20T04:04:16+5:302021-06-20T04:04:16+5:30

औरंगाबाद : जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणाला त्याच्या घरात घुसून लाठी, काठीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ...

An old quarrel broke out and the family broke into the house | जुन्या भांडणातून कुटुंबाला घरात घुसून मारहाण

जुन्या भांडणातून कुटुंबाला घरात घुसून मारहाण

औरंगाबाद : जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणाला त्याच्या घरात घुसून लाठी, काठीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. आरोपींनी तक्रारदारांच्या घरातील पाण्याची टाकी व अन्य साहित्याची तोडफोड केली आणि दुचाकीचे नुकसान केले. ही घटना १७ जून रोजी रात्री गारखेडा परिसरातील गजानननगरात घडली.

पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार शुभम गणेश काथार (२१, रा. गजाननगर, गारेखडा) हा तरुण १७ जून रोजी रात्री घरी बसलेला होता. यावेळी आरोपी गजानन माणिकराव साळुंके, सनी, त्याचे दोन मित्र आणि नातेवाईक महिलेने जुन्या वादातून काथार यांना घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केली. घरातील साहित्याचे नुकसान केले. काथार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात पोलिसांनी आराेपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदविला. पोलीस हवालदार विष्णू मुंढे तपास करीत आहेत.

Web Title: An old quarrel broke out and the family broke into the house