माळीवाड्याजवळ आढळला वृद्धाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:04 IST2021-05-30T04:04:46+5:302021-05-30T04:04:46+5:30
गंगाधर मोरे हे गेल्या पंधरा दिवसांपासूनच ठेकेदाराकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करत हाेते. त्यांच्यापश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली असा ...

माळीवाड्याजवळ आढळला वृद्धाचा मृतदेह
गंगाधर मोरे हे गेल्या पंधरा दिवसांपासूनच ठेकेदाराकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करत हाेते. त्यांच्यापश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली असा परिवार आहे. मोरे यांची मुले त्यांना दररोज जेवणाचा डब्बा आणून देत असल्याने, शनिवारी सकाळी मुलगा डब्बा घेऊन आला होता. तेव्हा त्यास गंगाधर मोरे झोपडीच्या बाजूला सळ्या पडलेल्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेची माहिती दौलताबाद पोलीस स्टेशनला तातडीने देण्यात आली. यानंतर पोलीस निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, अंमलदार नीलेश पाटील, परमेश्वर पालोदे, प्रभाकर पाटेकर, राजेश लाटे, सचिन त्रिभुवन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मोरे यांचे प्रेत उत्तरणीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी श्वान पथक, फॉरेन्सिक टिमला घटनास्थळी बोलावले होते.