शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जुना वाद उफाळून आला; घरासमोर कुटुंबावर गोळीबार, तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 11:30 IST

रांजणगावात मध्यरात्रीचा थरार; दोन आरोपी पसार

- मेहमूद शेखवाळूजमहानगर: जुन्या वादाच्या कारणावरून एका 25 वर्षीय तरुणावर गोळी झाडल्याची थरारक घटना मंगळवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास रांजणगाव शेनपुंजी येथे घडली. या घटनेत अर्जुन राजू काळे (25 रा. रांजणगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. 

रांजणगाव येथील अर्जुन काळे याची चुलत बहीण दीपाली ही चार-पाच वर्षांपूर्वी श्रावण सुरेश पिंपळे (रा.नायतळा, ता.निफाड, जि. नाशिक) याच्या सोबत पळून गेली होती. या घटनेनंतर काळे व पिंपळे कुटुंबीयात वाद सुरू होता. मंगळवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास अर्जुन याचा भाऊ धरम यास श्रावण याने फोनवरून शिवीगाळ केली. या नंतर काळे कुटुंबीय घराबाहेर आले. काही वेळाने श्रावणने साथीदारांसह तिथे येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद सुरू असताना अचानक श्रावणने गावठी पिस्तूल काढत त्यात गोळ्या भरू लागला. 

हा प्रकार पाहताच घाबरलेल्या काळे कुटुंबीय दुकानाचे शटर बंद करून जिव वाचविण्यासाठी घरात पळाले. मात्र, श्रावणने शटरवर गोळी झाडली. गोळी शटरच्या आरपार जाऊन अर्जुन काळेच्या गुढग्यात घुसली. काळे कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता श्रावण पिंपळे व त्याचा साथीदार दुचाकीवरून पसार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन गोळीबारात जखमी अर्जुन काळे यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरु आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद