एमसीव्हीसीसाठी यंदा जुनाच अभ्यासक्रम

By Admin | Updated: July 13, 2014 00:45 IST2014-07-13T00:31:12+5:302014-07-13T00:45:10+5:30

औरंगाबाद : ‘एमसीव्हीसी’साठी यंदापासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा आदेश पुस्तकांअभावी संचालक कार्यालयाने रद्द केला असून पुढच्या वर्षीपासून नवीन अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.

Old courses for MCVC this year | एमसीव्हीसीसाठी यंदा जुनाच अभ्यासक्रम

एमसीव्हीसीसाठी यंदा जुनाच अभ्यासक्रम

औरंगाबाद : ‘एमसीव्हीसी’साठी यंदापासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा आदेश पुस्तकांअभावी संचालक कार्यालयाने रद्द केला असून पुढच्या वर्षीपासून नवीन अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.
दरम्यान, सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव मार्गी लागल्याबद्दल एचएससी व्होकेशनलच्या शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. ७ जुलै रोजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश तराळे, उपाध्यक्ष जयंत भाभे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, उपसचिव रा.गो. जाधव यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील एमसीव्हीसी शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्होकेशनल विभागाच्या संचालकांनी यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर दाखल केला असून लवकरच त्यासंबंधी शासन आदेश जारी करण्याचे आश्वासन मंत्री टोपे यांनी बैठकीत दिले.
या बैठकीत जनरल फाऊंडेशन कोर्सच्या शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेत शिथिलता आणून एम.कॉम., बी.एड. ही अर्हता कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात १५० रुपये वाढ करण्यात आली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २१०० वरून २५०० रुपये ग्रेड पे करावा, तसेच २४ वर्षांनंतर मिळणारी वेतनश्रेणी ही तीन शिक्षक, निदेशकामागे एकास देण्याची मागणीही मान्य करण्यात आली.
या निर्णयाचे स्वागत व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. मनोहर वानखडे, डॉ. के. एल. करकरे, प्रा. विजय पाटील, प्रा. सविता पिंपळवाडकर, अतिया सिद्दीकी, पौर्णिमा देसाई, प्रा. प्रकाश हमणे, प्रा. भीमसिंग राजपूत, प्रा. प्रदीप सोळंके, महादेव बडदे आदींनी केले.

Web Title: Old courses for MCVC this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.