पाणलोट योजनेमुळे ओलित क्षेत्र वाढले

By Admin | Updated: June 9, 2014 01:12 IST2014-06-09T00:32:43+5:302014-06-09T01:12:00+5:30

श्रीक्षेत्र माहूर : गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाची माहूर तालुक्यावर सतत अवकृपा झाल्याने दोन्ही वर्षात पावसाळी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले़

Ointment zones have increased due to the catchment scheme | पाणलोट योजनेमुळे ओलित क्षेत्र वाढले

पाणलोट योजनेमुळे ओलित क्षेत्र वाढले

श्रीक्षेत्र माहूर : गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाची माहूर तालुक्यावर सतत अवकृपा झाल्याने दोन्ही वर्षात पावसाळी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले़ नुकसान भरपाईसाठी आलेल्या निधीतून माहूर तालुका कृषी कार्यालयाने शेतात अनेक कामे केली़ त्यामुळे कोरडवाहू माहूर तालुक्यातील ४ हजार हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे़
माहूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५२ हजार ९३० हेक्टर असून जंगलाचे प्रमाण १० हजार २९१ हेक्टर आहे़ पैकी २०२१ हेक्टर जमीन ओसाड व लागवडअयोग्य आहे़ बिगर शेती क्षेत्र ८९६ हेक्टर आहे़ चराऊ क्षेत्र म्हणून ४४३९ हेक्टर जमीन राखीव आहे़ लागवडीलायक क्षेत्र शेती ३४ हजार ४०० हेक्टर आहे़ इसारा क्षेत्र म्हणून १५ हजार ४५० हेक्टर जमीन आहे़ तर तालुक्यात ५ हजार ३११ हेक्टर शेती सिंचनाखाली आहे़ दोन वर्षांखाली हे क्षेत्र १५०० हेक्टर होते़ गेल्या दोन वर्षापासून सतत अतिवृष्टी व नापिकी १४०० मि़ मी़ पेक्षा जास्त झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले़ त्यातल्या त्यात यावर्षी तालुक्यातील सर्वच गावांना बसलेल्या गारपिटीच्या तडाख्याने होत्याचे नव्हते झाल्याने त्याचा परिणाम लग्नसराईवरही दिसून आल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना या दोन वर्षात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला़ त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना गारपीट अनुदान देण्यात येवून शेतकऱ्यांच्या शेती शेतीदुरूस्तीसह सिंचनक्षमता वाढविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कामांना प्राधान्याने सुरुवात करणे भाग पडले़ माहूरच्या तालुका कृषी कार्यालयाकडून गतिमान पाणलोट आदिवासी उपाययोजना या योजनेअंतर्गत २०१२-१३ मध्ये तुळशी कुपटी, मलकागुडा, मलकागुडातांडा, वाईबाजार, शेलू, करंजी, वायफनी, भगवती, रुपलानाईक तांडा, लसनवाडी, सतगुडा, सिंदखेड, गोकुळ गोंडेगाव येथे साठे तीन कोटी रुपये खर्चून शेत दुरूस्तीसह बांध बंदिस्ती मातीनाला बांध, सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध आदी कामे करण्यात आली़ तर २०१३-१४ चा चालू वर्षात चोरड, भोरड, जुनापाणी, अंजनखेड, सावरखेड, गोंडवडसा, वसराम नाईकतांडा, नाईकवाडी, हरडफ या गावांत सव्वा तीन कोटी रुपये खर्चून २५०० हेक्टर शेतजमिनीवर वरील कामे अंतिम टप्प्यात आहेत़ एकूण दोन वर्षात कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ६५०० हेक्टर श्ेत जमिनीवर जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत व याआधी शेततळे अभियान राबवून १५५ शेततळी तयार करण्यात आल्याने या कामाअंती शेतजमिनीत ११ लाख क्युबिक पाणी मुरणार आहे़ जलसंधारणाची कामे मशीन्सद्वारे होत असल्याने येथे मजुरांना काम देण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)

Web Title: Ointment zones have increased due to the catchment scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.