शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

अहो आश्चर्यम्... आरोग्य विभागाने पकडले २४९ डास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 11:23 AM

कामाची अशीही जबाबदारी 

ठळक मुद्देहत्तीरोग पसरविणाऱ्या ‘क्युलेक्स’ डासांची संख्या सर्वाधिक‘क्युलेक्स’ पाठोपाठ डेंग्यूचा ‘एडिस’ डास

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभाग म्हटला की, रुग्णालये आणि रुग्णसेवा ही कामे करणारा विभाग असे तुम्ही म्हणाल. मात्र, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या महिनाभरात शहरात तब्बल २४९ डास पकडले. हो... डासच पकडले. तुम्ही म्हणाल, डेंग्यू रोखण्यासाठी आता डास पकडण्याची मोहीम सुरू केली की काय? तर तसे काही नाही, तर पकडलेल्या डासांमध्ये कोणता रोग पसरविणाऱ्या डासांची संख्या अधिक आहे, हे पाहून त्यावरून आरोग्य विभागाची कामाची दिशा, धोरण व उपाययोजना ठरते. मात्र, ही बाब सर्वसामान्यांपासून अनभिज्ञ आहे.जुलैपासून शहराला डेंग्यूचा महाविळखा बसला. महापालिकेचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागालाही शहरातील रस्त्यांवर उतरावे लागले. ‘डेंग्यू’ पसरविण्यास ‘एडिस’ नावाचा डास कारणीभूत ठरतो. 

‘एडिस’सह क्युलेक्स आणि अ‍ॅनफिलिस या प्रकारचे डास प्रामुख्याने आढळतात. क्युलेक्स डासामुळे हत्तीरोग तर अ‍ॅनफिलिस डासामुळे हिवताप (मलेरिया) ची लागण होते. शहरात डेंग्यूची परिस्थिती पाहता कोणत्या प्रकारचे डास सर्वाधिक आहे, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हिवताप विभागातर्फे डासांची घनता काढली जाते. ही घनता काढण्यासाठीच कर्मचाऱ्यांना डास पकडावे लागतात.

असे पकडतात डास?ज्या भागांत डास अळींचे प्रमाण आढळते, त्या भागात सकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान डास पकडण्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी अडीच तास दिला जातो. एक लांब प्लास्टिकची नळी डासाजवळ धरली जाते. नळीच्या दुसऱ्या टोकातून तोंडावाटे कर्मचारी हवा आतमध्ये ओढतात. नळीच्या दुसऱ्या टोकाला जाळी असते. त्यामुळे डास तोंडात येत नाही. पकडलेले डास परीक्षा नळीत घेतले जातात. त्यानंतर तो कोणता डास आहे, याचा शोध घेतला जातो.

८१ ‘एडिस’ डास२४९ डासांमध्ये ९१ क्युलेक्स डास आढळले. शहरात डेंग्यूचा उद्रेक पसरविणारे ‘एडिस’ प्रकारचे ८१ डास पकडण्यात आले. या डासांमुळे डेंग्यूबरोबर चिकुनगुनियाची लागण होते, तर ७७ अ‍ॅनाफिलिस डास पकडण्यात आले. शहरात जुलैपासून आढळलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २८१ वर गेली आहे. हत्तीरोगाची रुग्णसंख्या ६८ आहे; परंतु ही संख्या अनेक वर्षांची असून, केवळ ९ रुग्ण नवीन असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

या भागांतून डास जेरबंद२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान विजयनगर, पडेगाव, जाधववाडी, घाटी निवासस्थान, चेलीपुरा, नारेगाव, रोशनगेट परिसर, संग्रामनगर, मिसारवाडी, खोकडपुरा, ज्योतीनगर, हिनानगर, आरेफ कॉलनी, एन-९, कैसर कॉलनी, मुकुंदवाडी भागांतून हे २४९ डास पकडण्यात आले.

उपाययोजना करण्यास मदतडास पकडून त्यातून डासांची घनता काढली जाते. आढळणाऱ्या डासांनुसार एखादा आजार वाढू शकतो का, याचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या जातात. - डॉ. विनायक भटकर, सहायक संचालक (हिवताप), सार्वजनिक आरोग्य विभाग

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल