राज्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी

By Admin | Updated: September 3, 2016 00:30 IST2016-09-03T00:07:55+5:302016-09-03T00:30:21+5:30

परळी : राज्यात युती शासन करत असलेले काम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचून त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे होत आहे की नाही? याचा आढावा घेण्यासाठी राज्यात

Officials from the State Minister | राज्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी

राज्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी


परळी : राज्यात युती शासन करत असलेले काम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचून त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे होत आहे की नाही? याचा आढावा घेण्यासाठी राज्यात शिवसेनेचे मंत्री दौरे करत आहेत. याचाच एक भाग म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी विविध योजनांची माहिती घेऊन रखडलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. २ सप्टेंबर रोजी दादाजी भुसे यांनी तालुक्यातील विवीध गावांची पाहणी केली. दरम्यान शिरसाळा गोवर्धन हिवरा, कासारवाडी-रामेवाडी, कौडगाव घोडा हुडा, गाढे पिंपळगाव येथील शिवजलक्रांतीच्या बंधाऱ्यावर जाऊन भुसे आणि गावकऱ्यांनी जलपूजन केले. गावकऱ्यांशी संवाद साधून सध्याच्या पीकअवस्थेची व पावसाची माहिती घेतली.
यावेळी जिल्हा प्रमुख बाळासाहेब पिंगळे, युवासेना जिल्हा प्रमुख सुशील पिंगळे, तालुका प्रमुख वैजनाथ सोळंके, शहर प्रमुख राजेश विभूते, वैजनाथ माने, उपशहर प्रमुख अभिजित धाकपाडे, रमेश भोईटे, गंगाधर साबळे, परमेश्वर कोचे, हनुमान भारती, तुकाराम फपाळ, शंकर डाके, संतोष भारती, रूपेश गायकवाड, कैलास कावरे, कैलास व्यवहारे, संतोष भोसले, जगमित्र पौळ, राजेश निर्मळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Officials from the State Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.