शहीद रामचद्र कच्छवे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By Admin | Updated: June 20, 2014 00:17 IST2014-06-20T00:17:50+5:302014-06-20T00:17:50+5:30
दैठणा : पाकिस्तान सीमेवर गस्त घालत असताना अपघाती मृत्यू झालेल्या शहीद रामचंद्र कच्छवे या जवानावर दैठणा या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले़

शहीद रामचद्र कच्छवे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दैठणा : पाकिस्तान सीमेवर गस्त घालत असताना अपघाती मृत्यू झालेल्या शहीद रामचंद्र कच्छवे या जवानावर दैठणा या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्याचा मृत्यूहदेह जि़ प़ प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता़ ग्रामस्थांनी दर्शनासाठी रिघ लावली होती़
दैठणा येथे रामचंद्र बन्सीधर कच्छवे हा जवान पंजाब येथील पटीयाला नजीक पाकिस्तानी सीमेवर रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना तोल जाऊन दरीत कोसळला़ त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता़ पटियाला येथील रुग्णालयात तोे तब्बल १५ दिवस मृत्यूशी झुंज देत होता.
१५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रामचंद्रने शेवटचा श्वास घेतला. त्याचा मृतदेह पंजाब येथून दिल्ली व औरंगाबाद येथे विमानाने आणण्यात आला. १८ जून रोजी सकाळी १० वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एन. एस. जी. कमांडोचे अधिकारी सुरेंद्रकुमार त्रिपाठी, एस. साबू त्यांचे सहकारी त्याच प्रमाणे पोलिस निरीक्षक तोरणे, फौजदार राजेश्वर जुक्टे, विजय कनके, पांडुरंग कातकडे, कुरेशी, ढेबरे, गवळी, गायकवाड, देवकते, मरगळ, राजू कुलकर्णी, मुख्यालयाचे सलामी गार्ड यांच्यासह धोंडी, माळसोन्ना, धारासूर व दैठणा येथील १० हजारावर नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)