व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप
By Admin | Updated: July 25, 2014 00:31 IST2014-07-24T23:59:21+5:302014-07-25T00:31:13+5:30
नांदेड : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण गट ‘क’ कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी विविध मागण्यांसाठी २४ जुलै रोजी एक दिवसाच्या संपावर गेले होते.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप
नांदेड : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण गट ‘क’ कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी विविध मागण्यांसाठी २४ जुलै रोजी एक दिवसाच्या संपावर गेले होते. संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बी.डी. बोड्डावार यांनी दिली.
२००६ नुसार निश्चित केलेल्या नॉर्म्सप्रमाणे पदे निश्चित करुन पदांचा सुधारीत आढावा करावा, समान काम- समान वेतन या तत्वावर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी सुधारण करुन वेतनश्रेणी दूर करावी, रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावीत, वर्षांनूवर्ष एकाच पदावर काम करणाऱ्या लिपीक कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी, यासाठी मुख्य लिपीकाचे पद अपग्रेड करुन त्यांचे रुपांतर अधीक्षक पदामध्ये करावे, तृतीय श्रेणी/ चतुर्थ श्रेणी कर्माऱ्यांना नियमकालिक बदल्यांचे धोरण निश्चित करुन जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात येऊ नयेत, शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी, भांडार लिपीकाचे पद स्वतंत्ररित्या भरावे, त्यासाठी कनिष्ठ लिपीक तथा भांडारपाल या पदाचा वापर करण्यात येऊ नये, अधीक्षक/ मुख्य लिपीक ही पदे १०० टक्के पदोन्नतीनेच भरावीत आदी मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले होते. संपात विभागीय समन्वयक बी.एस. खंडेराय, सचिव वहाब अन्सारी, उपाध्यक्ष एस.एम. परळे, सहसचिव- ए.एस. पिंपळगावकर, कोषाध्यक्ष व्ही.एस. कबनूरकर, कार्यकारिणी सदस्य- सय्यद इरशादअली, एस.के. सावरगावकर, शेख अजीम, एस.एस. कावटवार, आय.के. शेख सहभागी झाले होते.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात १५ जुलै २०१०, १८ डिसेंबर २०१३ व १ जुलै २०१४ रोजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्याबरोबर कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली, प्रश्न सोडविण्यासाठी मंत्र्यांनी संचालक, यांना कालबद्ध कार्यक्रम निश्चित करुन दिला, मात्र प्रशासनाने त्याची गंभीरपणे दखल घेतली नाही-बी.डी. बोड्डावार,
अध्यक्ष, व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण गट ‘क’ कर्मचारी संघटना