शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांचे पगार हजारोत; लाचेचे उड्डाण लाखोत; लाच घेण्यात पोलीस विभागाच आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 19:13 IST

एसीबीच्या पथकांनी केलेल्या २२ कारवायांमध्ये २६ जणांवार लाच घेताना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे गुन्हे नोंदविले आहे.

- राम शिनगारेऔरंगाबाद : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १ जानेवारी ते ८ जून २०२२ या कालावधीत लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण २२ प्रकरणांमध्ये २६ लाचखोरांना पकडण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांना २ हजार रुपयांपासून तीन लाख रुपयांपर्यंत लाचेची मागणी केली आहे. यातील काही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. यातील महिला आरोपी वगळता उर्वरित सर्वांना अटक केल्याची आकडेवारी एसीबीच्या संकेतस्थळावर दिली आहे.

लाचखोरीत पोलीस विभाग एक नंबरऔरंगाबाद जिल्ह्यात या वर्षात एकूण २२ जणांना लाच घेताना पकडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्या पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. सहा प्रकरणात सात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडले.

लाचखोरीत कोणत्या विभागाचे किती?जिल्ह्यात लाच घेतलेल्या २२ प्रकरणांमध्ये पोलीस विभागातील ६, मनपा ३, जिल्हा परिषद ३, महसूल २, बांधकाम विभागातील २ आणि आरोग्य, महावितरण, शिक्षण, वक्फ बोर्ड आणि धर्मदाय विभागातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सर्वाधिक सापळे मार्चमध्येएसीबीच्या विविध पथकांनी औरंगाबाद जिल्ह्यात १ जानेवारी ते ८ जून २०२२ या कालावधीत २२ प्रकरणांमध्ये लाच घेताना पकडले आहे. यातील सर्वाधिक सात कारवाया मार्च महिन्यात करण्यात आल्या. त्यानंतर एप्रिल आणि फेब्रुवारी महिन्यात प्रत्येकी चार, मे महिन्यात तीन, जानेवारी महिन्यांत दोन आणि चालू महिन्यातील आठ दिवसांमध्ये दोनजणांना लाच घेताना पकडले आहे.

मालमत्ता गोठविण्यासाठी प्रस्ताव नाहीशहरासह जिल्ह्यात एकाचीही मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव एसीबीने तयार केलेला नसल्याची माहिती समोर आली.

२६ जणांवर गुन्हे, ९० टक्के अटकएसीबीच्या पथकांनी केलेल्या २२ कारवायांमध्ये २६ जणांवार लाच घेताना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे गुन्हे नोंदविले आहे. त्यापैकी २० पेक्षा अधिक जणांना अटक केली होती. त्यातील अनेकांना न्यायालयाकडून पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर नियमित जामिनावर सुटका करण्यात आली. २२ पैकी एकाही प्रकरणाचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलेले नाही.

एसीबीला कळवा नागरिकांनी कोणत्याही कामांसाठी लोकसेवक पैशाची मागणी करीत असेल तर एसीबीला कळविले पाहिजे. त्यांच्यावर एसीबीकडून तत्काळ कारवाई केली जाईल.- डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, एसीबी

टॅग्स :PoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबाद