अधिकारी गायब; कार्यालय वाऱ्यावर
By Admin | Updated: November 30, 2015 23:31 IST2015-11-30T23:10:36+5:302015-11-30T23:31:58+5:30
बीड : येथील मत्स्य विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी कार्यालय वाऱ्यावर सोडून दिवसभर गायब होते. यामुळे येथे माहितीसाठी आलेल्या नागरीकांना रिकाम्या हाताने परतावे लागले

अधिकारी गायब; कार्यालय वाऱ्यावर
बीड : येथील मत्स्य विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी कार्यालय वाऱ्यावर सोडून दिवसभर गायब होते. यामुळे येथे माहितीसाठी आलेल्या नागरीकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ही माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष राहूल वाईकर यांना समजताच त्यांनी गांधीगिरी पद्धतीने रिकाम्या खूर्चीला हार घालून निषेध केला.
सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने प्रत्येकजन कामे करण्यास अधिक वेग देतात. परंतु येथील मत्स्य विकास अधिकारी कार्यालय याला अपवाद असून या कार्यालयाला कामाचे कसलेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या कार्यालयात केवळ दोन महिला कर्मचाऱ्यांशिवाय इतर सर्व अधिकारी, कर्मचारी गायब होते. संभाजी बिग्रेड कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता अधिकारी, कर्मचारी दौऱ्यावर असल्याचे सांगितले.
कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी अधिकारी जालन्याला एका कार्यक्रमाला गेल्याचे सांगितले. उडवाउडवीच्या उत्तरांमुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हा मत्स्य विकास अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खूर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.
संभाजी बिग्रेडचे बीड तालुकाध्यक्ष गणेश मस्के, सुरेश गिराम, आशिष आडसूळ, अर्जुन काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)