आक्षेपार्ह ‘व्हाईस क्लिप’ व्हायरल; सोमवारी जिल्हा बंदची हाक
By Admin | Updated: May 20, 2017 23:30 IST2017-05-20T23:27:05+5:302017-05-20T23:30:38+5:30
बीड : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याची ‘व्हाईस क्लिप’ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे

आक्षेपार्ह ‘व्हाईस क्लिप’ व्हायरल; सोमवारी जिल्हा बंदची हाक
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याची ‘व्हाईस क्लिप’ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात शनिवारी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात सोमवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
भ्रमणध्वनीवरुन एकाशी संवाद साधताना एका व्यक्तीने महापुरुषांबद्दल अर्वाच्च भाषा वापरली होती. या संवादाची ‘व्हाईस क्लिप’ सर्वत्र व्हायरल झाली असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. शनिवारी सायंकाळी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. सोमवारी संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. संंबंधित माथेफिरुला तात्काळ अटक करुन त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हावासियांनी बंद यशस्वी करावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे राहुल वाईकर, भाऊसाहेब डावकर, तुषार घुमरे, रायचंद्र जाधव, नामदेव शेळके, बाबू गुंदेकर दिलीप लांडे यांनी केले.