व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह मजकुराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:40 IST2017-09-13T00:40:23+5:302017-09-13T00:40:23+5:30
व्हॉट्सअपवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचा व आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी वसमत येथे एकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. समाजाच्या भावना दुखावणारा मजकूर टाकल्याबद्दल अनेक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.

व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह मजकुराचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : व्हॉट्सअपवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचा व आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी वसमत येथे एकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. समाजाच्या भावना दुखावणारा मजकूर टाकल्याबद्दल अनेक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.
वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयातील कर्मचारी राहुल देव दीक्षितने व्हॉट्सअप ग्रुपवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर टापून समाजाच्या भावना दुखावणारे कृत्य केले. याप्रकाराविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या प्रकरणी माजी नगरसेवक राजकुमार एंगडे यांनी वसमत ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधीकारी शशिकिरण काशीद करत आहेत. आक्षेपार्ह मजकूर प्रकरणाने आंबेडकरवादी संघटना व जनतेमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.