वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर गुन्हा
By Admin | Updated: June 9, 2015 00:28 IST2015-06-09T00:28:16+5:302015-06-09T00:28:16+5:30
मुरुड/अहमदपूर : भर रस्त्यात वाहन उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकाविरूद्ध मुरुड पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर गुन्हा
मुरुड/अहमदपूर : भर रस्त्यात वाहन उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकाविरूद्ध मुरुड पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील अंजुम सय्यद हे आपल्या ताब्यातील तिनचाकी (एमएच २४, ई ८०७०) हा बसस्थानकासमोरील रस्त्यात उभा करून प्रवाशांची चढ-उतार करीत होता़ त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता़ दरम्यान, याच ठिकाणी लातूर तालुक्यातील पिंपरी येथील बालाजी भिसे हा आपल्या ताब्यातील अॅपे (एमएच २४, जे ३०९०) रस्त्यात उभा करून प्रवाशांची चढ-उतार करीत होता़ रहदारीस अडथळा होत असल्याचे पाहून पोलिस उपनिरीक्षक संतोष गिते यांच्या फिर्यादीवरून मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास नापोकॉ़ इंगळे करीत आहेत़ तसेच अहमदपूर बसस्थानकासमोर चोबळी येथील राजकुमार येरे हा ट्रॅव्हल्स (एमएच १२, एयू २६९८) उभा करून रहदारीस अडथळा निर्माण करीत होता़ पोलिस कॉन्स्टेबल राम गोमारे यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्याचबरोबर शहरातील सावरकर चौकात रामदास घाडगे (रा़ माळेगाव) हा आपल्या ताब्यातील ट्रॅव्हल्स (एमएच १४, व्ही़८१९७) सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरित्या उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला़ याप्रकरणी नापोकॉ़ शेटकार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला़