संस्थापक, मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: January 30, 2016 00:25 IST2016-01-30T00:15:36+5:302016-01-30T00:25:09+5:30
तुळजापूर : आश्रम शाळेतील नोकरीची खोटी आॅर्डर देवून चार वर्ष काम करून घेतल्याची तसेच या कालावधीत दोन लाख रुपये घेतल्याची तक्रार तुळजापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

संस्थापक, मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा
तुळजापूर : आश्रम शाळेतील नोकरीची खोटी आॅर्डर देवून चार वर्ष काम करून घेतल्याची तसेच या कालावधीत दोन लाख रुपये घेतल्याची तक्रार तुळजापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. यावरून संबंधित आश्रम शाळेच्या संस्थापकासह मुख्याध्यापिकेविरूध्द फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिक्षण मंडळ संचलित क्रांतीवीर लहुजी साळवे आश्रम शाळा आहे. या संस्थेचे संस्थापक दिनकर लक्ष्मण क्षीरसागर व मुख्याध्यापिका जाधव यांनी उमरगा येथील सिध्देश्वर लिंबराज डिडवळ यांच्या मुलास २००९ मध्ये नोकरीची खोटी आॅर्डर देवून नोकरीवर ठेवून घेतले. तसेच २००९ ते २०१३ या कालावधीत त्यांच्याकडून दोन लाख रुपये देखील मागून घेतले. चार वर्षे काम केल्यानंतर संबंधितांनी दिलेली आॅर्डर खोटी असल्याचे २०१३ मध्ये लक्षात आले.
याप्रकरणी सिध्देश्वर डिडवळ यांनी शुक्रवारी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर दिनकर क्षीरसागर व मुख्याध्यापिका जाधव यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.