डॉल्बी चालक-मालकाविरूध्द गुन्हा

By Admin | Updated: April 15, 2017 00:28 IST2017-04-15T00:26:05+5:302017-04-15T00:28:27+5:30

उस्मानाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत तब्बल १०० डेसिबल पेक्षाही अधिक आवाजात डॉल्बी वाजविल्याप्रकरणी डॉल्बी चालक- मालकाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

Offense against the Dolby Driver-Owner | डॉल्बी चालक-मालकाविरूध्द गुन्हा

डॉल्बी चालक-मालकाविरूध्द गुन्हा

उस्मानाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत तब्बल १०० डेसिबल पेक्षाही अधिक आवाजात डॉल्बी वाजविल्याप्रकरणी डॉल्बी चालक- मालकाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास शहरात घडली़
शहरातील जिल्हा रूग्णालय, पोष्ट आॅफिस मार्गावरून गुरूवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती़ या मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डॉल्बी चालकाला बस व टॉप काढण्याच्या सूचना दिल्या होत्या़ मात्र, संबंधितांनी याकडे दुर्लक्ष करीत डॉल्बी मोठ्या आवाजात वाजविली़ डॉल्बीच्या आवाजाची तपासणी केली असता हा आवाज १०० डेसीबल पेक्षाही अधिक दिसून आला़ या प्रकरणी पोहेकॉ पुरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉल्बी चालक, मालकासह पाच जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
विना परवाना लावले साऊंड
शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यासमोरून गुरूवारी रात्री एका ट्रॅक्टरवर (क्ऱएम़एच़२५- एच़८७०६) विना परवाना साऊंड सिस्टीम लावून वाजविली जात होती़ या प्रकरणी पोना पोतदार यांच्या फिर्यादीवरून बिलाल कुरेशी (रा़ सोलापूर) याच्याविरूध्द आनंदनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Offense against the Dolby Driver-Owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.