अंगारिका चतुर्थीनिमित्त भाविकांचे लोंढे राजूरकडे, वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:46 IST2017-11-07T00:46:35+5:302017-11-07T00:46:55+5:30

अंगारिका चतुर्थीनिमित्त राजुरेश्वराच्या दर्शनासाठी सोमवारी संपूर्ण मराठवाड्यातील हजारो भाविकांची राजूरला जाणा-या रस्त्यांवर रीघ पाहायला मिळाली.

 On the occasion of Angarika Chaturthi, rush to Rajur of the devotees, change in the way of traffic | अंगारिका चतुर्थीनिमित्त भाविकांचे लोंढे राजूरकडे, वाहतूक मार्गात बदल

अंगारिका चतुर्थीनिमित्त भाविकांचे लोंढे राजूरकडे, वाहतूक मार्गात बदल

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : अंगारिका चतुर्थीनिमित्त राजुरेश्वराच्या दर्शनासाठी सोमवारी संपूर्ण मराठवाड्यातील हजारो भाविकांची राजूरला जाणा-या रस्त्यांवर रीघ पाहायला मिळाली. त्यामुळे चोहोबाजूंचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
वर्षातून एक किंवा दोन वेळेस येणाºया अंगारिका चतुर्थीला श्री दर्शन विशेष महत्त्वाचे मानले जाते. विशेषत: राजूर येथील राजुरेश्वराच्या दर्शनासाठी मराठवाडा, खान्देश, विदर्भासह राज्याच्या कानाकोपºयातून भाविक येतात. मंगळवारी अंगारिका चतुर्थी असल्याने सोमवारी दुपारपासूनच सिल्लोड, अंबड, औरंगाबाद, देऊळगाव राजा, फुलंब्री इ. मार्गावरून महिला, पुरूष, तरुण भाविक राजूरच्या दिेशेने मार्गक्रमण करताना दिसले. पायी येणा-या भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्था, संघटना व दानशूर मंडळींनी मोफत चहा, पाणी, फराळ, आंघोळी करिता थंड व गरम पाण्याची सोय रस्त्यावर जागोजागी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. दुपारपासूनच भाविकांची गर्दी राजूरात दाखल होण्यास सुरूवात झाली होती. रात्री ९ वाजता गर्दीत वाढ झाली होती. गणपती संस्थानने भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी दर्शन रांगेत कठडे, थंडीपासून बचावासाठी निवारा, वैद्यकीय उपचार, पिण्यासाठी पाणी, पासधारक भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दर्शन रांगेत सीसीटीव्ही कॅमेरे तसेच महिला व पुरूष भाविकासांठी स्वतंत्र दर्शन रांगा इ. जय्यत तयारी के ली आहे. तसेच अंगारिका चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पायी येणारे भाविक, ग्रामीण भागातून येणाºया दिंंड्या, पालखी इ. समूहांनी येणाºया भाविकांना सामान्य दर्शन रांगेतून प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांनी पासच्या रांगेतून दर्शनासाठी आग्रह करू नये, असे आवाहन गणपती संस्थानचे व्यवस्थापक गणेशराव साबळे यांनी केले आहे.

Web Title:  On the occasion of Angarika Chaturthi, rush to Rajur of the devotees, change in the way of traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.