अंगारक चतुर्थीनिमित्त भाविक नांदेडात झाले दाखल
By Admin | Updated: July 15, 2014 00:56 IST2014-07-15T00:04:29+5:302014-07-15T00:56:51+5:30
विशाल राजूरकर, नांदेड उद्या दि. १५ जुलै रोजी अंगारीका चतुर्थी असून, यानिमित्ताने गाडीपुरा येथील आखाडा गणपती मंदिरात दर्शनासाठी ठिकठिकाणाहून भक्त नांदेडात दाखल झाले आहेत.
अंगारक चतुर्थीनिमित्त भाविक नांदेडात झाले दाखल
विशाल राजूरकर, नांदेड
उद्या दि. १५ जुलै रोजी अंगारीका चतुर्थी असून, यानिमित्ताने गाडीपुरा येथील आखाडा गणपती मंदिरात दर्शनासाठी ठिकठिकाणाहून भक्त नांदेडात दाखल झाले आहेत.
अंगारीका मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते़ यादिवशी अनेक जण उपवास करतात़ सायंकाळी मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जाते. चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो़ यापूर्वी मंगळवार, १८ फेब्रुवारी २०१४ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आली होती़ यानंतरची अंगारीका मंगळवार, ९ डिसेंबर २०१४ रोजी येणार आहे. जुन्या नांदेडातील गाडीपुरा येथील आखाडा गणपती मंदिर हे पुरातण मंदिर असून येथील गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची श्रद्धा आहे़ येथे दर अंगारीकेला चतुर्थीला दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात़ यानिमित्त अभिषेक, आरती, पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते़ गणेशभक्तांची गर्दी होत असल्याची माहिती पूजारी रतनबाई हिरासिंग चौव्हाण यांनी दिली़
पुराणातील कथा
जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येईल त्यावेळी ती विशेष पुण्यप्रद मानली जाते़ तिला अंगारक संकष्टी किंवा अंगारकी असे म्हणतात़ हा अंगारक कोण, अंगारक म्हणजे मंगऴ तो अंगारकासारखा म्हणजेच जळणाऱ्या निखाऱ्यासारखा लाल-लाल दिसतो म्हणून त्याला अंगारक असे म्हणतात़ याची पुराणात कथा आहे़ अंगारक या भारद्वाज ऋषी पूत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले़ गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव 'अंगारक' हे लोकस्मरणात राहील़ हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता़अधिक मासातील अंगारकी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते़ कारण ती २१ वर्षातून एकदाच येते़