शासकीय कामात अडथळा, दोन जणांविरुद्ध गुन्हा
By | Updated: December 4, 2020 04:15 IST2020-12-04T04:15:01+5:302020-12-04T04:15:01+5:30
मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी निल्लोड येथील आहेर वस्तीवरील रहिवाशांनी गट क्र. ६३४ ...

शासकीय कामात अडथळा, दोन जणांविरुद्ध गुन्हा
मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी निल्लोड येथील आहेर वस्तीवरील रहिवाशांनी गट क्र. ६३४ या गायरानमधून येण्या-जाण्यासाठी असलेल्या वहिवाटीचा गाडी रस्ता मोकळा करून देणेबाबत तहसीलदारांकडे अर्ज आला होता. त्यांच्या आदेशानुसार सदर गाडी रस्ता मोकळा करण्यासाठी तलाठी विजय चव्हाण व मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल दोघे गेले होते. यावेळी आप्पा माधव कांबळे व शिवाजी आप्पा कांबळे तेथे आले व त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच जेसीबीसमोर येऊन आत्महत्या करण्याची धमकी देत काम थांबविले. अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना आदेश दाखविला. मात्र, त्यांनी जुमानले नाही. म्हणून वरील दोघांवर कामात आडथळा आणला म्हणून वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.