‘अॅप’द्वारे पोषण आहारावर नियंत्रण
By Admin | Updated: July 24, 2016 00:41 IST2016-07-24T00:31:16+5:302016-07-24T00:41:21+5:30
जालना : शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबवून त्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराव आत्ता मोबाईल अॅपव्दारे दैनदिन माहिती मिळणार

‘अॅप’द्वारे पोषण आहारावर नियंत्रण
जालना : शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबवून त्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराव आत्ता मोबाईल अॅपव्दारे दैनदिन माहिती मिळणार असल्याने पोषण आहार योजनेत पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचे माहिती आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने विशेष अप्लिकेशन विकसीत केले आहे. त्याव्दारे जिल्ह्यातील १ हजार ८८१ शाळेवर लक्ष ठेवता येणार आहे.
आजघडीला राज्यातील ८६ हजार ६६० शाळेत जवळपास ९५ हजार ३८ हजार २७१ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते. त्यात जालना जिल्ह्यातील १ हजार ८८१ शाळांचा समावेश आहे. यातील प्रत्येक दोन महिन्याला १ हजार क्विटल वर पोषण आहारचा पुरवठा करण्यात येत आहे. या योजनेनुसार किती विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन देण्यात आले. प्रत्येक शाळेत कोणत्या प्रकारचा आहार देण्यात आला त्याची दररोजची आकडेवारी मोबाईल अॅपवर मिळेल. हे अॅप पुणे येथील एनआयसीने विकसीत केले आहे. पोषण आहाराची माहिती मोबाईलवर अॅपवर आॅनलाईन आणि एसएमएम व्दारे संबंधित गटशिक्षणाधिकारी त्यांच्या मोबाईवर मिळेल त्यामुळे आपल्याकडे किती स्टॉक आहे. का नाही याची खबरदारी आधीच मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा तसेच कोणत्या प्रकारचा पोषण आहार देण्यात आला. आणि तो कोणत्या कारणासाठी दिला गेला नाही. याची माहिती या प्रणालीव्दारे एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.