करंजखेड ग्रामपंचायतीतर्फे परिचारिकेचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:02 IST2021-05-13T04:02:16+5:302021-05-13T04:02:16+5:30
करंजखेड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त ग्रामपंचायतीतर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. करंजखेड प्राथमिक ...

करंजखेड ग्रामपंचायतीतर्फे परिचारिकेचा सत्कार
करंजखेड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त ग्रामपंचायतीतर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
करंजखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३३ गावांमधील रुग्णांवर उपचार केले जातात. येथील परिचारिका एल. एच. जाधव यांनी केवळ पाच महिन्यांत २ हजार ५०० जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले. यामुळे ग्रामपंचायतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच संगीताबाई सोनवणे, व्यापारी संघाचे अध्यक्ष विनायकराव काळे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. किरण शेळके, महावितरणचे अधिकारी कैलास सोनवणे, आरोग्य पर्यवेक्षक संजय भोसले, पर्यवेक्षक सुभाष कुरांडे, एस. व्ही. शिंदे, एस. बी. राठोड, आर. आर. काकडे उपस्थित होते.
फोटो : करंजखेड ग्रामपंचायतीतर्फे परिचारिका जाधव यांचा सत्कार सरपंच संगीताबाई सोनवणे यांनी केला.
120521\img_20210512_130832_1.jpg
करंजखेड ग्रामपंचायततर्फे परिचारिका जाधव यांचा सत्कार करताना सरपंच संगीताबाई सोनवणे.