जिल्ह्यातील मतदारांची संख्या २४ लाखांवर

By Admin | Updated: September 3, 2014 00:19 IST2014-09-03T00:07:18+5:302014-09-03T00:19:43+5:30

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील मतदारयादीत ७९ हजार मतदारांची भर पडली आहे.

The number of voters in the district is 24 lakhs | जिल्ह्यातील मतदारांची संख्या २४ लाखांवर

जिल्ह्यातील मतदारांची संख्या २४ लाखांवर

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील मतदारयादीत ७९ हजार मतदारांची भर पडली आहे. यातील ६२ हजार नावे जुलैअखेरीस प्रसिद्ध झालेल्या यादीत समाविष्ट झाली असून उर्वरित १७ हजार नावे ही पुरवणी यादीत येणार आहेत. अजूनही मतदार नोंदणी मोहीम सुरू असून यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.
मार्चअखेरीस जिल्ह्यातील मतदारांची संख्या २३ लाख ८२ हजार इतकी होती. लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक विभागाने पुन्हा मतदार नोंदणी मोहीम राबविली. संपूर्ण जून महिना ही मोहीम सुरू होती. या मोहिमेदरम्यान तब्बल ६२ हजार मतदारांनी अर्ज केले. या सर्वांची नावे आता यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीतील मतदारांची संख्या २४ लाख ४४ हजार १९७ झाली आहे. याशिवाय आयोगाने जुलै आणि आॅगस्ट महिन्यात दर रविवारी मतदार नोंदणी मोहीम घेतली. या मोहिमेतही जिल्हाभरातून आणखी १७ हजार नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत. या लोकांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात येत आहेत. ही नावे पुरवणी यादीत प्रसिद्ध केली जाणार आहेत. लोकसभेपासून जिल्ह्यात मतदारांची संख्या ७९ हजारांनी वाढली आहे.
विधानसभानिहाय मतदारसंख्या
मतदारसंघस्त्रीपुरुषएकूण
सिल्लोड१,२६,१२११,४८,५९३२,७४,७१४
कन्नड१,२९,५३२१,४८,२०९२,७७,७४१
फुलंब्री१,२९,९८६१,५१,४४२२,८१,४२८
औरंगाबाद मध्य१,३२,८८९१,४५,४७८२,७८,३६७
औरंगाबाद पश्चिम१,२८,८००१,४९,७६४२,७८,५६५
औरंगाबाद पूर्व१,१८,८६६१,३५,४७०२,५४,३३६
पैठण१,१९,५४०१,३९,९२५२,५९,४६५
गंगापूर१,२४,९४८१,४३,३२५२,६८,२७७
वैजापूर१,२८,४३७१,४२,८६७२,७१,३०४
एकूण११,३९,११९१३,०५,०७३२४,४४,१९७
महिला मतदार कमीच
जिल्ह्यातील मतदारयादीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या खूप कमी आहे. जिल्ह्यात एकूण १३ लाख पुरुष मतदार आहेत; पण स्त्री मतदारांची संख्या त्यापेक्षा १ लाख ६१ हजारांनी कमी म्हणजे ११ लाख ३९ हजार इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने महिला मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यावर विशेष भर दिला होता; तरीही हा फरक कमी झालेला नाही. अजूनही असंख्य महिला मतदार नोंदणीपासून दूर आहेत.

Web Title: The number of voters in the district is 24 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.