आकडे टाका; वीज वापरा !

By Admin | Updated: December 22, 2014 23:38 IST2014-12-22T23:38:33+5:302014-12-22T23:38:33+5:30

राजेश खराडे, बीड ‘कुणीही या अन् आकडा टाकून वीज घ्या’ अशीच काहीशी अशीच स्थिती महावितरण कंपनीची झाली आहे. बीडमध्ये केवळ ग्राहकच आकडे टाकून वीज वापरतात असे नाही

Number; Use the power! | आकडे टाका; वीज वापरा !

आकडे टाका; वीज वापरा !


राजेश खराडे, बीड
‘कुणीही या अन् आकडा टाकून वीज घ्या’ अशीच काहीशी अशीच स्थिती महावितरण कंपनीची झाली आहे. बीडमध्ये केवळ ग्राहकच आकडे टाकून वीज वापरतात असे नाही. बीड पालिकाही आता यात मागे नाही. अ‍ॅटोमॅटीक टाईमर स्वीच नादुरूस्त झाल्यामुळे थेट वीज जोडणी घेतली आहे. त्यामुळे वीज वापराची नोंद होत नाही. ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टींगमध्ये ही बाब उघडकीस आली आहे.
दिवस मावळताच दिवे आॅन तर उजेडताच आॅफ करण्यासाठी शहरातील २२३ रोहित्रांवर ‘टाईमर स्वीच’ बसविण्यात आले होते. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून हे स्वीच बंद अवस्थेत असल्यामुळे येथील मीटर अवलंबून न राहता नगरपालिकेने मधला मार्ग काढत थ्री फेज वरील कनेक्शन डायरेक्ट डिस्ट्रक्शन बॉक्स मधून सर्व्हिस वायरच्या सहाय्याने विद्युत खांबावरील तारांना जोडून वीज चोरी दिवसाढवळ्या केली जात आहे. याचा फटका महावितरण कंपनी व ग्राहकांना बसत आहे.
घरगुती, व्यवसायिक, औद्योगिक व शेतीपंपधारकांना वीजवसुली बाबत सातत्याने तगादा लावला जात आहे. अतिरीक्त विजबिल झाल्यास मीटर जप्ती करुन शहरातील विद्युतप्रवाह बंदही करण्यात येत आहे. मात्र नगरपालिकेकडून विज चोरी तर होतच आहे शिवाय दिवसाही पथदिवे हे सुरूच ठेवले जात असल्याबाबत ‘लोकमत’ ने स्टिंग आॅपरेशनकेले आहे. विद्युत चोरी करून शहरातील गणेश नगर, शहेंशहा नगर, सहयोग नगर, गुजराती कॉलनी आदी भागातील पथदिवे हे दिवसाच सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत बीड अर्बनच्या वतीने अनेक वेळा पत्रव्यवहार केला असून न.प.च्या मुख्यधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासोबत वेळोवेळी बैठका झाल्या आहेत. अद्यापर्यंत कोणतिही ठोस कारवाई झालेली नाही. मध्यंतरी महावितरण कंपनीने वसुलीबाबत कडक धोरण अवलिंबल्यामुळे तरी नगरपालिकेकडून महिन्याकाठी ८ लाख बिलापोटी ७ लाख रुपयांची वसुली केली जात आहे मात्र न.प. कडे १५ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. शिवाय त्यावरील १८ टक्के व्याज हे वेगळच त्यामुळे थकबाकीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. शहरात पथदिव्यांकरिता जवळपास २२३ ठिकाणी कनेक्शन देण्यात आले आहेत.
नोटिसावर नोटिसा
नगरपालिकेने विद्युत खांबावर टाईमर स्वीच बसवून घ्यावेत याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. तर थकबाकीबाबत नोटिसाही देण्यात आल्या आहेत. मात्र महावितरणच्या कारवाईचे गांभीर्य हे नगरपालिकेलाही चांगलेच माहित असल्याने त्याकडे दुर्लंक्ष होत आहे.४
शहरातील २२३ रोहित्रांवर पथदिव्यांकरिता ‘टाईमर स्वीच’ बसविण्यात आले होते.
४मात्र काळाच्या ओघात या स्वीचमध्ये बिघाड झाला आहे.
४याची दुरूस्ती न करता त्या-त्या विभागातील लोकप्रतिनिधींनी अनाधिकृतपणे डायरेक्ट विद्युत तारांवरून कनेक्शन घेतले असल्याचे समोर आले आहे.
४त्यामुळे महिन्याकाठी महावितरणालाच भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सर्वसामान्य ग्राहाकंकडून वसुली अन्यथी मीटर जप्तीचे सुत्र अविलंबणारे महावितरण नगरपालिकच्या बाबतीत ऐवढी नरमाईची भुमिका का घेत आहे? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पथदिव्यांच्या विज बिलापोटी न.प.कडे १५ कोटी ४६ लाख रुपयांची बाकी आहे. शिवाय विजचोरीतून लागणारा चुना वेगळाच.
सहयोग नगरात पथदिवे आॅनच
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सहयोग नगरातील सर्वच पथदिवे दिवसाही सुरू होते. अतिरीक्त थकबाकीच्या नावाखाली श्रारनियमनाचा तगादा लावण्यात येत आहे तर दुसरी दिवसाही पथदिवे सुरू ठेवण्याची किमया महावितरणच्या उदासिनतेमुळे होत आहे. त्यामुळ सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Number; Use the power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.