मराठवाड्यात टँकर्सची संख्या पुन्हा वाढू लागली!
By Admin | Updated: August 30, 2016 01:19 IST2016-08-30T01:13:34+5:302016-08-30T01:19:15+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा टँकर्सची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकर्सची अधिक गरज भासू लागली आहे.

मराठवाड्यात टँकर्सची संख्या पुन्हा वाढू लागली!
औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा टँकर्सची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकर्सची अधिक गरज भासू लागली आहे.
बीड जिल्ह्यात पाच गावे आणि ३० वाड्यांमध्ये आजघडीला २९ टँकर्स चालू आहेत, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २० गावांमध्ये ३० टँकर्स चालू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात टँकरसाठी अधिग्रहीत केलेल्या खाजगी विहिरींची संख्या २० तर बीड जिल्ह्यात टँकर्ससाठी अधिग्रहीत केलेल्या खाजगी विहिरींची संख्या २ आहे. मागील आठवड्यात या दोन जिल्ह्यांत मिळून ३६ टँकर्स चालू होते. २६ आॅगस्ट अखेरच्या अहवालानुसार ही संख्या वाढून ५९ झाली आहे. २३ टँकर्स वाढले आहेत.
जायकवाडी धरण ६६ टक्के भरले. वरच्या धरणांमधला पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे आणि बाष्पीभवनामुळे व पिण्यासाठी पाणी वापरावे लागत असल्यामुळे आता जायकवाडीतला साठा एक टक्का घटला आहे. मोठा पाऊस झाल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. अन्यथा उन्हाळ्यात पुन्हा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल व टँकर्सची संख्या वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.