टँकरची संख्या ४०० वर

By Admin | Updated: May 4, 2016 00:31 IST2016-05-04T00:23:41+5:302016-05-04T00:31:13+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाण्याची टंचाईही वाढू लागली आहे़ वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील २४६ गावे आणि १४ वाड्यांसाठी तब्बल ३७९ टँकरना मंजुरी दिली आहे़

Number of tankers up to 400 | टँकरची संख्या ४०० वर

टँकरची संख्या ४०० वर

उस्मानाबाद : जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाण्याची टंचाईही वाढू लागली आहे़ वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील २४६ गावे आणि १४ वाड्यांसाठी तब्बल ३७९ टँकरना मंजुरी दिली आहे़ तर ३४७ गावे आणि टँकरसाठी २४७ अशी एकूण १३२६ विहिरी, कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़
मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, शहरी भागातील नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे़ टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायत स्तरावरून येणाऱ्या प्रस्तावांना प्रशासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे़ सध्या जिल्ह्यातील २४६ गावे आणि १४ वाड्यांसाठी ३७९ टँकरना मंजुरी देण्यात आली आहे़ यात उस्मानाबाद तालुक्यातील ४० गावांसाठी ७८ टँकर, तुळजापूर तालुक्यातील २३ गावांसाठी ३५ टँकर, उमरगा तालुक्यातील ३० गावांसाठी ५४ टँकर, लोहारा तालुक्यातील ७ गावांसाठी २० टँकर, कळंब तालुक्यातील ४० गावांसाठी ५३ टँकर, भूम तालुक्यातील ५३ गावांसाठी ५८ टँकर, वाशी तालुक्यातील २५ गावांसाठी ३१ टँकर तर परंडा तालुक्यातील २८ गावांसाठी ३० टँकर सुरू करण्यात आले आहेत़
यात उस्मानाबाद तालुक्यातील विठ्ठलवाडी, बुकनवाडी, कनगरा, तोरंबा, मुळेवाडी, सकणेवाडी, कोलेगाव, कौडगाव बावी, रूईढोकी, जवळे दुमाला, रूईभर, उंबरेगव्हाण, नांदुर्गा, बोरखेडा, इर्ला, आंबेवाडी, दूधगाव, खामगाव, गडदेवधरी, डकवाडी, कोळेवाडी, कामेगाव, वाणेवाडी, बामणीवाडी येथे प्रत्येकी एक, पाडोळी, पाटोदा, केशेगाव, मेंंढा, काजळा, टाकळी बेंबळी, वडगाव सिध्देश्वर येथे प्रत्येकी दोन, करजखेडा, तेर, सांजा येथे प्रत्येकी तीन, पळसप येथे चार, येडशी, कसबेतडवळे, बेंबळी येथे प्रत्येकी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे़ तुळजापूर तालुक्यातील अणदूर- पुजारी तांडा, ढेकरी, भातंब्री, बिजनवाडी, चिंचोली, मसला खुर्द, खानापूर, चिवरी, वडगाव काटी, आरळी खुर्द, आलियाबाद, सांगवी मा़ वडगाव ला़ येथे प्रत्येकी एक, कसई, खुदावाडी तांडा, होर्टी, जळकोट, किलज येथे प्रत्येकी दोन, सलगरा दिवटी, आपसिंगा येथे प्रत्येकी तीन तर मंगरूळ येथे चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे़
उमरगा तालुक्यातील मातोळा, नारंगवाडी प़ कोळसूर के़ बाभळसूर, हिप्परगावाडी, काळनिंबाळा, कोरेगाव, मळगी, भिकार सांगवी, कोरेगाववाडी, जकेकूरवाडी, कोळसूर (गु़), गणेशनगर, नाईकनगर (एक), नाईकनगर (सु़), त्रिकोळी, सावळसूर आदी गावात प्रत्येकी एक, चिंचोली ज, नारंगवाडी पू़ कडदोरा, कवठा, कसगी, आनंदनगर, माडज, कलदेव निंबाळा, डिग्गी येथे प्रत्येकी दोन, औराद, बेळंब, येणेगूर, पेठसांगवी, बलसूर येथे प्रत्येकी तीन टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे़ या शिवाय लोहारा, कळंब, भूम, वाशी व परंडा तालुक्यातील गावा-गावांनाही टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे़ (प्रतिनिधी)
टँकरसाठी ३३८ अधिग्रहणे
जिल्ह्यातील २४६ गावांसाठी ३७९ टँकर सुरू आहेत़ हे टँकर भरण्यासाठी ३३८ विहिरी, कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ याशिवाय ३४७ गावांसाठी ९८८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ या कूपनलिकांवरून गावा-गावांतील ग्रामस्थ पाणी भरत आहेत़ टँकर भरण्यासाठी आणि गावा-गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल १३२६ विहिरी, कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़
१३७ खेपा कमी
जिल्ह्यातील २४६ गावांसाठी ३७९ टँकर सुरू आहेत़ या टँकरच्या ७७४० खेपा मंजूर आहेत़ मात्र, एप्रिल अखेरच्या अहवालानुसार मंजूर ७७४० खेपांपैकी केवळ ६००५ खेपा झाल्या असून, यात १७३५ खेपा या कमी झाल्याची नोंद आहे़ केवळ खंडित वीजपुरवठा आणि दूरवरील अधीग्रहण यामुळे या टँकरच्या खेपा कमी होताना दिसत आहेत़

Web Title: Number of tankers up to 400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.