राज्यात नेत्र रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:06+5:302021-02-05T04:22:06+5:30
औरंगाबाद : कोरोनामुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. त्या आता सुरळीत झाल्या आहेत. परंतु, वर्षभरात खूप काम थांबलेले आहे. त्यामुळे ...

राज्यात नेत्र रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढविणार
औरंगाबाद : कोरोनामुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. त्या आता सुरळीत झाल्या आहेत. परंतु, वर्षभरात खूप काम थांबलेले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांची गती वाढवावी लागेल. राज्यातील नेत्र रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटनेतर्फे सोमवारी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एम. कुलकर्णी, किरण तात्या तारक, डॉ. ज्योती मुंडे, डॉ. संतोष काळे, शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. महेश वैष्णव, राज्य सरचिटणी डॉ.व्ही. जी. बडे, डॉ. अनिल काळे आदी उपस्थित होते.
राजेश टोपे म्हणाले, कोरोनामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया थांबलेल्या होत्या. तेव्हा नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांनी शिबिराच्या माध्यमातून १७ जानेवारी रोजी २ हजार ५५० नेत्र शस्त्रक्रिया केल्या. यापुढे शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. नेत्र रुग्णालये ४० खाटांचे केले जातील, असे ते म्हणाल्याची माहिती डॉ. महेश वैष्णव यांनी दिली.
आरोग्याचे बळकटीकरण
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र,जिल्हा रुग्णालयांचे बळकटीकरण केले जाईल. अभियंते, वकील, खासगी क्षेत्रातील अधिकारी जेव्हा सरकारी रुग्णालयात येऊन उपचार घेतील, तेव्हा खरा आनंद होईल, असे राजेश टोपे म्हणाले.
फोटो ओळ...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सत्कार करताना शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. महेश वैष्णव.