मनपा, जीटीएलमधील ‘तो’ करार अखेर रद्द!
By Admin | Updated: May 31, 2014 01:25 IST2014-05-31T01:18:22+5:302014-05-31T01:25:44+5:30
औरंगाबाद : शहरातील विकास आराखड्यात येणार्या १४ रस्त्यांतील विद्युत खांब व डीपी काढण्यासाठी मनपाने जीटीएलबरोबर केलेला करार आज रद्द झाला.

मनपा, जीटीएलमधील ‘तो’ करार अखेर रद्द!
औरंगाबाद : शहरातील विकास आराखड्यात येणार्या १४ रस्त्यांतील विद्युत खांब व डीपी काढण्यासाठी मनपाने जीटीएलबरोबर केलेला करार आज रद्द झाला. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उपअभियंता पी. आर. बनसोडे, जीटीएलचे जगदीश चेलारमाणी, अभिजित देशपांडे, प्रशांत मजुमदार, दिलीप घोडके यांच्यातील बैठकीअंती हा निर्णय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आणि जीटीएलच्या कार्यालयात दोन बैठकी झाल्या. यापुढे रस्त्यांत अडथळा निर्माण करणारे जीटीएलचे खांब पालिकेच्या यंत्रणेकडून काढण्यात येणार आहेत. २०१२ पासून जीटीएलकडे विद्युत खांब काढण्याचे काम दिले. मात्र, कंपनीकडून त्यातील अर्धे काम पूर्ण झाले. आता पालिका स्वत:हून टेंडर काढून रस्त्यांतील खांब हटविणार आहे. त्यासाठी जीटीएलचा एक विभागीय स्तरावरील अधिकारी सुपरव्हिजनसाठी मनपाला देण्यात येईल. लोटाकारंजा आणि कैलासनगर या रस्त्यांतील खांब काढण्याप्रकरणी बैठकीत चर्चा झाली. लोटाकारंजा रस्त्यातील खांब काढण्यासाठी जीटीएल खर्च अंदाजपत्रक पालिकेला सादर करील. त्यानुसार पालिका ते काम करणार आहे. कैलासनगर ते लक्ष्मण चावडी या रस्त्यातील खांब काढण्यासाठी कंत्राटदार एन. बी. कुलकर्णी यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जीटीएल कंपनी त्यांना एबी केबल उपलब्ध करून देणार आहे. १४ विकास आराखड्यातील ६ रस्त्यांवरील खांब जीटीएलने काढले. यापुढे जीटीएल सुपरव्हिजन करील. मनपा टेंडर काढून खाजगी ठेकेदारांकडून ते खांब हटविणार आहे. वेळोवेळी शटडाऊन घेण्यासाठी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर पालिकेच्या सेवेत देण्यात येईल. मनपाने जीटीएलला दिले २ कोटी रुपये मनपाने जीटीएलला दिले. १२ कोटी ७६ लाख रुपयांमध्ये ५०० खांब काढण्याच्या वाटाघाटी कंपनीबरोबर झाल्या होत्या.