शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आता लढायचेच! छत्रपती संभाजीनगरात दोन दिवसांत ३ हजार १७० अर्जांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:17 IST

महापालिका निवडणूक २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संसर्ग, आरक्षणाचा पेच आदी अनेक कारणांमुळे निवडणूक रखडत गेली.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी इच्छुकांनी चांगलीच कंबर कसल्याचे दिसते आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल १३५४ अर्ज इच्छुकांनी नेले. दोन दिवसांत ३ हजार १७० अर्जांची विक्री झाली. एकेका उमेदवाराने दोन ते तीन अर्ज खरेदी केले. पुढील तीन ते चार दिवसांत अर्ज विक्रीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणूक २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संसर्ग, आरक्षणाचा पेच आदी अनेक कारणांमुळे निवडणूक रखडत गेली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पाच वर्षे प्रशासकीय राजवट होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका होत आहेत. २३ डिसेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज विक्री सुरू झाली. पहिल्याच दिवशी शहरातील नऊ निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून १८१६ अर्ज विक्रीला गेले. दुसऱ्या दिवशी १३५४ अर्ज गेल्याची माहिती देण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज विक्री करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उघडताच अर्ज घेण्यासाठी इच्छुक आणि त्यांचे समर्थक गर्दी करीत आहेत. सिल्लेखाना येथील महापालिका झोन कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करावे लागले.

इच्छुक म्हणतात माघार नाहीच...२०१५ च्या मनपा निवडणुकीत अनेक इच्छुकांचा पराभव झाला. २०२० मध्ये संधी मिळेल असे अनेकांना वाटत होते. मात्र, वाट पाहण्यात आणखी पाच वर्षे निघून गेले. तब्बल दहा वर्षांनंतर अनेक इच्छुकांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतून माघार नाहीच. लढायचे म्हणजे लढायचेच असा निर्धार करीत अनेक इच्छुकांनी बुधवारी अर्ज नेले.

तिकीट मिळो किंवा ना मिळो....प्रभाग पद्धतीत राजकीय पक्षाच्या उमेदवारीने निवडणूक लढणे सोपे जाईल, असे अनेकांना वाटत आहे. अपक्ष निवडणूक लढविणे कोणालाही सोपे नाही. तिकिटासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावून ठेवली आहे. तिकीट न मिळाल्यास पर्यायी पक्षांकडून उमेदवारी मिळविणे, तेसुद्धा शक्य न झाल्यास अपक्ष लढण्यावर अनेकजण ठाम आहेत.

कोणत्या प्रभागातून किती अर्ज विक्रीप्रभाग -------------अर्ज संख्या ---------- कार्यालय३, ४, ५ ------------१६५ ------ स्मार्ट सिटी कार्यालय (घनकचरा विभाग)१५, १६, १७ ---------१०७ ------ झोन-२ कार्यालय, सिल्लेखाना६, १२, १३, १४ ------१२८ ------- उपविभागीय कार्यालय (तहसीलच्या शेजारी)१, २, ७ ------------८३ ------- मनपा झोन-४ कार्यालय, टीव्ही सेंटर८, ९, १०, ११-------१०४ -------- गरवारे स्टेडियमजवळ, आयटी पार्क२३, २४, २५ --------२०३ -------- मनपा झोन-६ कार्यालय, सिडको२१, २२, २७ -------३०९ -------- विभागीय क्रीडा संकुल, मिशन लक्ष कार्यालय२६, २८, २९ --------१३३ -------- मनपा झोन-८ कार्यालय, सातारा परिसर१८, १९, २०--------१२२ --------- मनपा झोन-९ कार्यालय, जालना रोड.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Municipal Elections: High demand for application forms.

Web Summary : Eager candidates rush to file for Chhatrapati Sambhajinagar's municipal elections. Over 3,170 application forms sold in two days, signaling intense competition and a strong desire to contest after a five-year administrative period.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2025