शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

चित्र पालटले, आता बोटावर मोजावेत एवढेच पोलिस अधिकारी पैसे घेत नाहीत: मीरा बोरवणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:50 IST

मीरा बोरवणकर यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान

छत्रपती संभाजीनगर : जेव्हा मी तरुण आयपीएस अधिकारी होते, तेव्हा बोटावर मोजता येतील एवढेच पोलिस अधिकारी पैसे घेत होते. आता मात्र बोटावर मोजावे एवढेच लोक पैसे घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीला राजकारणी आणि जनता जबाबदार असल्याचे निवृत्त पोलिस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर-चड्डा म्हणाल्या. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार डॉ. मीरा बोरवणकर यांना निवृत्त न्या. सुनील देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मंचावर डॉ. सविता पानट, मंगेश पानट, हेमंत मिरखेलकर आणि संजीव कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख ५० हजार रु. असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘पोलिस, राज्यकर्ते; आव्हाने आणि समाज’ या विषयावर बोरवणकर यांचे व्याख्यान झाले.

त्या म्हणाल्या की, प्रत्येकाची निष्ठा ही संविधानाप्रति ठेवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांच्यापेक्षा संविधानाची ताकद मोठी आहे. पोलिस ट्रेनिंग सेंटर, यशदा आणि महाविद्यालयात हे शिकवायला हवे. तरुणपणी महिला आहे, म्हणून मला पोलिस अधीक्षकपदी नेमणूक दिली जात नव्हती. आपल्यासोबतचे अन्य अधिकारी अधीक्षक होऊन तीन ते चार वर्षे झाली होती. तेव्हा आपण भांडून पोलिस अधीक्षकपदाची पोस्टिंग मागितली तेव्हा मला छत्रपती संभाजीनगर शहर मिळाले.

आंतरराष्ट्रीय मानकानुसार १ लाख नागरिकांमागे २२० पोलिस असावेत. पण महाराष्ट्रात १६० पोलिस आहेत. तर अन्य राज्यांतील हा आकडा १५३ आहे. १० लाख लोकसंख्येमागे ५० न्यायाधीश असायला हवेत. पण आपल्याकडे केवळ २० आहेत. प्रत्येक राज्यात पोलिसांची २० टक्के पदे रिक्त असतात. यामुळेच ही यंत्रणा बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आपला समाज पोलिसांनी कायद्यानुसार वागावे, अशी अपेक्षा ठेवतो आणि दुसरीकडे मात्र बदलापूरसारख्या घटनेतील आरोपीला गोळ्या घातल्यानंतर त्यांचे कौतुकही करतो. न्या. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संजीव कुलकर्णी यांनी तर संचालन नीता पानसरे यांनी केले.

पुरस्काराची रक्कम पोलिस फाउंडेशनलापुरस्काराचे ५० हजार रुपये पोलिस फाउंडेशनला देत असल्याची व पुरस्कार महाराष्ट्र पोलिसांना समर्पित करीत असल्याची घोषणा बोरवणकर यांनी केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिस