अपंगासाठी आता तीन टक्के निधी
By Admin | Updated: June 29, 2014 00:38 IST2014-06-29T00:18:52+5:302014-06-29T00:38:39+5:30
उस्मानाबाद :आता पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नाच्या (सेस) अर्थसंकल्पात ३ टक्के निधी अपंग व्यक्तींचे कल्याण व पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अपंगासाठी आता तीन टक्के निधी
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेप्रमाणेच आता पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नाच्या (सेस) अर्थसंकल्पात ३ टक्के निधी अपंग व्यक्तींचे कल्याण व पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी व जि.प. अध्यक्षांना देण्यात आले आहेत.
अपंग कल्याण कृती आराखड्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगार विषयक उपाययोजनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय योजना, केंद्र शासनाच्या योजना आणि दारिद्र्य निर्मूलन योजनेंतर्गत किमान ३ टक्के लाभार्थी अपंग असावेत, असे स्पष्ट निर्देश आहेत. तसेच अपंगाचे कल्याण व पुनर्वसनाकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी हा अपंगांसाठी राखून ठेवावा, असेही निर्देशित करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेसोबतच आता पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यांनीसुद्धा जिल्हा परिषदेप्रमाणेच त्यांच्या स्वनिधीतून अपंगांच्या कल्याण व पुनर्वसनाकरिता ३ टक्के निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सदरील ३ टक्के निधी हा अपंगाच्या कल्याणासाठीच खर्च करावा, असे स्पष्टपणे म्हटले आहे. हा निधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सुपूर्द करण्याबाबतही सांगण्यात आले आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविताना त्यात एकूण लाभार्थ्यांपैकी ३ टक्के लाभार्थी हे अपंग प्रवर्गातील असणे बंधनकारक केले आहे. (प्रतिनिध्
ाी)