आता युतीशिवाय पर्यायच नाही...!

By Admin | Updated: October 1, 2014 00:39 IST2014-10-01T00:39:27+5:302014-10-01T00:39:27+5:30

जालना : जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक बुधवारी होत आहे. राज्यात युती व आघाडीची ताटातुट झाल्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत काय होणार,

Now there is no option ...! | आता युतीशिवाय पर्यायच नाही...!

आता युतीशिवाय पर्यायच नाही...!


जालना : जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक बुधवारी होत आहे. राज्यात युती व आघाडीची ताटातुट झाल्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक म्हणजे स्थानिक पुढाऱ्यांची सत्वपरीक्षाच असल्याचा सूर राजकीय मंडळींमधून उमटत आहे.
जिल्हा परिषदेत भाजपा-सेनेचे बहूमत आहे. या बहुमताच्या जोरावरच २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत युतीने दोन्ही पदे मिळविली. परंतु आता युतीमध्ये ताटातूट झाल्याने या निवडणुकीत युती ठेवणार की स्वतंत्र लढणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
एकूण ५५ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी १५ सदस्य आहेत. ५ अपक्षांपैकी ४ जणांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे.यात राष्ट्रवादी काँग्रसचे १६ , काँग्रेसचे ३ व मनसेचा एक सदस्य आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या काळात अध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्षपद भाजपाकडे होते. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या या पदांच्या निवडणुकीसाठी भाजपाने प्रतिष्ठेचा मुद्दा करून अध्यक्षपद आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेतले. त्यामुळे उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळाले.
दोन्ही पक्षातील अध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या सदस्यांना सभापतीपदाचे गाजर दाखविण्यात आले होते. मात्र युतीमध्ये तूट पडल्यानंतर आता काय होणार, हे इच्छूक सभापतींनाही कळेनासे झाले आहे.
चार सभापतीपदांसाठी ही निवडणूक होत आहे. मनसेचे एकमेव सदस्य स्वत: विधानसभा निवडणूक रिंंगणात आहेत. तर काँग्रेसचेही एक सदस्य रिंंगणात आहेत. विधानसभा स्वबळावरच लढविण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी कोणते पक्ष युती करून निवडणूक लढविणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजपा, शिवसेना सदस्यांची एकत्रित बैठक मंगळवारी सायंकाळपर्यंत झालेली नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस सदस्यांचीही बैठक नाही.
त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुका स्वबळावरही होऊ शकतात, अशी शक्यताही नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसने २१ सप्टेंबर रोजी झालेली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक स्वबळावर लढली होती. कारण या दिवशी सभागृहात काँग्रेसचा चारपैकी एकही सदस्य उपस्थित नव्हता. तर मनसेच्याही एकमेव सदस्याची गैरहजेरी होती. परंतु सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपा व सेना यांच्यात युती झाली नाही, तर स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे.
४जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी २ वाजता ही निवडणूक होत आहे. प्रशासनाने निवडणुकीची पूर्वतयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीत काय होणार, याविषयीची उत्कंठता ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील जनतेलाही लागली आहे.
४चारही प्रमुख पक्षांतील नेत्यांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत एकमेकांशी संपर्क साधलेला नव्हता. त्यामुळे या पक्षातील सदस्यही संभ्रमात होते. परंतु काही जाणकार सदस्यांच्या माहितीनुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना-भाजपाची युती असल्याने सभापती पदासाठी ती होऊ शकते. कारण त्यासाठीची चर्चा पूर्वीच झालेली आहे.

Web Title: Now there is no option ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.