पाणंदमुक्तीसाठी आता गावात मुक्काम
By Admin | Updated: February 18, 2016 23:42 IST2016-02-18T23:26:36+5:302016-02-18T23:42:23+5:30
हिंगोली : स्वच्छ भारत मिशनतंर्गत हागणदारीमुक्तीसाठी गावांमध्ये गुडमॉर्निंग पथक मुक्कामी राहणार आहे.

पाणंदमुक्तीसाठी आता गावात मुक्काम
हिंगोली : स्वच्छ भारत मिशनतंर्गत हागणदारीमुक्तीसाठी गावांमध्ये गुडमॉर्निंग पथक मुक्कामी राहणार आहे. पुन्हा ही पथके कार्यान्वित झाल्याने आता नागरिकांना उघड्यावर जाणे महागात पडणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात स्वच्छता अभियानातील कामाची गती हरवली होती. आता पुन्हा एकदा हा विभाग जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे. गुड मॉर्निंग पथके कार्यान्वित करून वसमत तालुक्यातील काही गावांत मुक्काम करण्यात आला होता. तेथे सकाळी उघड्यावर जाणाऱ्यांना या पथकातील कर्मचारी अडवून लोटा ताब्यात घेत आहेत. शिवाय त्यांचे तेथेच प्रबोधन केले जात आहे. अनेकांनी या पथकाची धास्ती घेतली. अनेकांनी निमूटपणे शौचालय बांधकामच सुरू केल्याचे चित्र पहायला मिळाले.
या पथकामुळे होत असलेला परिणाम लक्षात घेता पाचही पंचायत समितीअंतर्गत येणारी ७३ गावे शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्यासाठी गुडमॉर्निंग पथक नेमण्यात आली आहेत. गावात स्वच्छतागृहाची सुविधा असूनही वापर होत नाही. त्यामुळे दंडाची कार्यवाही करण्यात येणार आहे. यावेळी गृहभेटी घेऊन कुटुंबाशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले जाणार आहे. तसेच गावातील उर्वरित वैयक्तिक स्वच्छतागृहांचे बांधकाम व त्याचा वापर करण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. पुढील आठवड्यात गुडमॉर्निंग पथके गावात धडकणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली कोतवाल यांनी दिली. (प्रतिनिधी)