शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता म्हणा ‘छत्रपती संभाजीनगर’ महापालिका; जिल्ह्याबाबत अधिसूचना, हरकती, सूचनांसाठी २७ मार्चपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 06:57 IST

शहराचे नाव बदलले, तरी महापालिकेचे नाव जुनेच होते.

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आल्यानंतर, आता महापालिकेचेही नाव ‘छत्रपती संभाजीनगर महापालिका’ असे करण्यात आले आहे, तर जिल्हा, तालुका व मंडळाबाबत महसूल व वनविभागाने अधिसूचना काढली आहे. 

शहराचे नाव बदलले, तरी महापालिकेचे नाव जुनेच होते. प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी २४ फेब्रुवारी रोजी प्रशासकीय ठराव मंजूर करून ‘छत्रपती संभाजीनगर महापालिका’ असा बदल करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्याच्या नगरविकास विभागाने सोमवारी त्यास मंजुरी दिली. 

सूचना, हरकती मागवल्याजिल्हा, तालुका व मंडळाच्या नावाबाबत महसूल व वनविभागाने सोमवारी अधिसूचना काढली असून, हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. ‘छत्रपती संभाजीनगर’ असा बदल विभागीय आयुक्तालयापासून होणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाला तालुका, मंडळ, सज्जापर्यंत नावातील बदल करावा लागेल. सरकारी वेबसाइट्स, अभिलेखांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असा उल्लेख सुरू होईल. 

स्थगितीची मागणी हायकाेर्टाने फेटाळलीऔरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांची नावे बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशीव करण्याबाबत केंद्र सरकारने २४ फेब्रुवारीला मंजुरी दिल्यावर राज्य सरकारने अधिसूचना काढली. या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.n या शहरांची नावे बदलण्यापूर्वी सरकारने हरकती व सूचना न मागविताच परस्पर निर्णय घेतल्याने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. n राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी सांगितले की, शहराचे नामांतर करण्यास हरकती व सूचना मागवण्याची आवश्यकता नाही. मात्र, महसूल विभागाच्या दप्तरी शहरांची नावे बदलण्यासाठी सरकारने २७ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत.n स्थगितीला अंतरिम आदेश देण्याची मागणी मान्य करण्यास न्यायालयाने नकार दिला. सरकार दप्तरी शहराचे बदलेले नाव आणि बाहेर वेगळे नाव वापरल्यामुळे गोंधळ उडेल, असे म्हणत न्यायालयाने पुढील सुनावणी २७ मार्च रोजी ठेवली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद