शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

आता पुरे झाले मालमत्ताधारकांचे लाड; महानगरपालिका जप्तीनंतर थेट लिलाव करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 7:24 PM

मालमत्ताधारकांचा मिळणारा थंड प्रतिसाद पाहता कावलेल्या प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारीपासून मालमत्तांची जप्ती करून थेट लिलाव करण्याचा मनोदय  व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे१ फेबु्रवारीपासून मनपा थकबाकीदारांचा आवळणार फासथकबाकी वसुलीसाठी मनपाने पन्नास टक्केव्याज माफीची योजना सुरू केली.

औरंगाबाद : दैनंदिन अत्यावश्यक बाबींवर खर्च करणे अवघड होऊन बसलेल्या महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करताना अडचणी येत असताना कंत्राटदारांचे देणे २०० कोटींपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी मनपाने पन्नास टक्केव्याज माफीची योजना सुरू केली. या योजनेला मालमत्ताधारकांचा मिळणारा थंड प्रतिसाद पाहता कावलेल्या प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारीपासून मालमत्तांची जप्ती करून थेट लिलाव करण्याचा मनोदय  व्यक्त केला आहे.

चालू आर्थिक वर्षात शहरातील अडीच लाख मालमत्ताधारकांकडून ४५० कोटी रुपये येणे अपेक्षित आहे. मागील दहा महिन्यांमध्ये मनपाच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी फक्त ७८ कोटी रुपये आले. मालमत्ताकराच्या थकबाकीचा आकडा ५५० कोटींहून अधिक आहे. जास्त वसुली करण्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पावले उचलली आहेत. नियमित मागणी वॉर्ड कार्यालये वसूल क रीत आहेत. बड्या थकबाकीदारांसाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. त्यांना रोजच्या रोज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. दंड व व्याजाच्या रकमेत सूट देण्याची योजना आतापर्यंत तीनदा राबविण्यात आली. थकबाकी भरण्यासाठी मालमत्ताधारक अजिबात प्रतिसाद देत नाहीत. आर्थिक वर्ष संपत आले असताना उद्दिष्टांच्या फक्त १७ टक्के वसुली आहे. सर्व उपाययोजना करूनही तिजोरीत चार पैसे येण्यास तयार नाहीत.

१२ जानेवारीपासून मनपाने सुरू केलेल्या ५० टक्के व्याज माफीत फक्त ४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीनंतर योजनेला मुदतवाढ  देण्यात येणार नसल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. हतबल झालेल्या प्रशासनाने मालमत्ताधारकांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. तीत त्यांनी वसुलीचा आढावा घेतला. जप्त मालमत्तांचा लिलाव करण्याची सूचना त्यांनी केली. महापालिका आतापर्यंत केवळ जप्तीच्या कारवाया करीत होती. जप्त मालमत्ता थकबाकी भरल्यानंतर परत केली जात होती. मात्र यापुढे मालमत्तांचा लिलाव करून थकीत रक्कम वसूल केली जाणार आहे. 

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरAurangabadऔरंगाबाद