शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

आता तडीपारांचे पोस्टर्स लागणार चौकात; औरंगाबाद गुन्हे शाखेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 12:46 PM

शहरातील तडीपार गुन्हेगारांवर पोलिसांनी करडी नजर केली असून, चौकाचौकात डिजिटल बॅनरवर त्यांचे नाव व फोटो लावून जनतेला सतर्क करण्याची गुन्हे शाखेची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे.

ठळक मुद्देचौकाचौकात डिजिटल बॅनरवर त्यांचे नाव व फोटो लावून जनतेला सतर्क करण्याची गुन्हे शाखेची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे.८२ लोकांची लिस्ट असून, गुन्हेगारीवर अंकुश घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने सीसीटीव्हीने शहर जोडणे सुरू केले, विशेष पोलीस अधिकारी नियुक्त केले आहेत

औरंगाबाद : आॅल आऊट या सर्च आॅपरेशनमध्ये प्रत्येक वेळी तडीपारांचाच सर्रास वावर आढळून आला. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांनी करडी नजर केली असून, चौकाचौकात डिजिटल बॅनरवर त्यांचे नाव व फोटो लावून जनतेला सतर्क करण्याची गुन्हे शाखेची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे.

शहरातील विविध गुन्हेगारी कारवाईत अनेकदा समज देऊनही गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याचे गुन्हे शाखेच्या लक्षात आले आहे. शहरातील काही ठिकाणी तडीपार राजरोषपणे वावरताना दिसून येत आहेत. शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानाही नियमाचे उल्लंघन केल्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. ८२ लोकांची लिस्ट असून, गुन्हेगारीवर अंकुश घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने सीसीटीव्हीने शहर जोडणे सुरू केले, विशेष पोलीस अधिकारी नियुक्त केले आहेत, त्यामुळे बहुतांश गुन्हेगार शोधण्यास मदत होत आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचारी पोहोचेपर्यंत ड्रोणदेखील वापरणार आहे, अशा विविध उपाययोजना आखल्या आहेत.

आॅल आॅऊट आॅपरेशनमध्ये प्रत्येक वेळी तडीपार अस्तित्व व ओळख लपवून राजरोसपणे शहरात वावरत आहेत. त्यावर एकच शक्कल पोलिसांनी लढविण्याचे ठरविले आहे, त्यावर सध्या उच्च स्तरीय विचारमंथन व कायदेशीर बाजूदेखील वरिष्ठांनी तपासल्या असून, आता गुन्हे शाखेकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. वसाहतीतून गुन्हेगार व्यक्तीचा संचार व गुन्हेगारी कारवाई करण्याच्या हेतूने फिरणारी व्यक्ती दिसली, तर विशेष पोलीस अधिकारीच नव्हे, तर सामान्य नागरिकदेखील पोलिसांना फोन करून माहिती सांगू शकतात. त्यामुळे गुन्हेगाराच्या मुसक्या आवळता येतील, हा यामागील हेतू असल्याचे वरिष्ठ अधिका-यांचे मत आहे. 

आठवडाभरात बॅनर्स लागतील...कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारी कारवाया रोखणे गरजेचे आहे. राजरोसपणे शहरात फिरणाºया तडीपारांवर अंकुश ठेवण्याकरिता त्यांचे फोटोसह नाव असलेले बॅनर्स शहरातील विविध चौकांत लावण्यात येणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणा-यांवर यामुळे वचक बसणार असून, गुन्हेगारी कारवाईवर अंकुश बसणार आहे. सध्या शहरात ८२ तडीपारांची यादी असल्याचे समजते, वेळप्रसंगी पूर्वपरवानगीशिवाय तुम्हाला प्रतिबंधित हद्दीत येता येत नाही, तरीदेखील काही आरोपी शहरात गुन्हेगारी कारवाईच्या उद्देशाने येत असल्याचा संशय आहे. त्याकरिता फोटो व नाव असल्याने मुदतपूर्व गुन्हेगार येणार नाही, असे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले.